Wednesday, May 1, 2024
Homeताज्या घडामोडीमालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण

मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण

नंदुरबार(प्रतिनिधी) : मुके प्राणी प्रसंगी आपल्या जीवाची बाजी लावतात आणि मालकाचे संरक्षण करून मालकाच्या प्रती इमान निभावतात; हे अनेक प्रसंगातून पाहायला मिळाले आहे. बिबट्याला (bibtya) शिंगावर घेऊन मालकाचे रक्षण करणारी म्हैस मात्र विरळीच म्हटली पाहिजे. चक्क बिबट्याला शिंगावर उचलून फेकत प्राणघातक हल्ल्यातून वृद्धाला वाचवण्याची घटना तळोदा तालुक्यात घडली.

तळोदा शहरातील बादशाह अर्जुन भरवाड (वय ७५ वर्षे) हे म्हशी चारण्यासाठी गेले असता दलेलपूर शिवारातील दिगंबर सूर्यवंशी यांच्या केळीच्या शेतात अचानक बिबट्या आणि त्याचे २ बछडे त्यांच्यावर चालून आले. बादशाह भरवाड यांच्यावर बिबट्याने हल्ला केला तेव्हा त्यांनी झटापट करायचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्याने त्यांच्या उजव्या हाताला जबर चावे घेऊन जखमी केले. दरम्यान, झटापट करताना ते खाली कोसळले.

जखमी वृद्धाने दिलेल्या माहितीनुसार ते खाली पडताच बिबट्या पुन्हा धावून आला त्यावेळी अचानक त्यांची म्हैस मदतीला धावून आली. बिबट्या त्यांच्यावर पुन्हा हल्ला करणार तेवढ्यात म्हशीने बिबट्याला चक्क आपल्या शिंगावर उचलून फेकत झुंज दिली. पाहता पाहता झुझ करून बिबट व बछडे यांना पळवून लावले आणि वृद्धाचे प्राण वाचले.

मागे यांच परिसरात एका १० वर्षाच्या बालकावर हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती नंतर एका शेतकऱ्याला जायबंदी केले होते. याबाबत वनविभागाने बिबटया जेरबंद करण्यासाठी पिजरा लावावा अशी मागणी होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -