Monday, May 6, 2024
Homeमहामुंबईबॉम्बेडाईंग, श्रीनिवास मिलच्या कामगारांना लवकरच घरे मिळणार!

बॉम्बेडाईंग, श्रीनिवास मिलच्या कामगारांना लवकरच घरे मिळणार!

राष्ट्रीय मिल मजदूर संघ शिष्टमंडळाला म्हाडाचे आश्वासन

मुंबई (प्रतिनिधी) : बॉम्बे डाईंगच्या स्प्रिंग- टेक्स्टाइल आणि श्रीनिवास मिलच्या ३८९४ कामगारांना लवकरच घरे देण्याचे ठाम आश्वासन म्हाडाचे कार्यकारी अभियंता प्रशांत धात्रक यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या शिष्टमंडळाला बुधवारी वांद्रे येथील कार्यालयात दिलें आहे.

सदर घरांबाबत करण्यात आलेल्या खोट्या तक्रारींवर सनियंत्रण कमिटीचे चेअरमन यांनी या घरांचा ताबा देण्या बाबत मनाई हुकूम दिला होता; परंतु राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि कृती समितीच्या नेत्यांनी या प्रश्नावर सविस्तर खुलासे करून सत्यस्थिती समोर आणली आणि संनियंत्रण कमिटीचे चेअरमन यांनी ही मनाई उठविली. त्याप्रमाणे सोडतीत विजयी ठरलेल्या कामगारांना घरे देण्याची प्रक्रिया सुरू करावी, असा हुकूमही संनियंत्रण समितीने म्हाडाला दिला होता. तरीही म्हाडाकडून घरे देण्यास दिरंगाई केली जात होती. तेव्हा कामगारांना घरे त्वरित मिळावी, यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाने ही तातडीने भेट घेतली.

मुंबई महानगरपालिकेकडून इमारतींना ताबापत्र (ओसी) मिळाले नसल्याचे कळताच राष्ट्रीय मिल मजदूर संघाने पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.रा. मि. म. संघाच्या या एकूण प्रयत्नावर पात्र उमेदवारांची यादी इमेलवर टाकण्यास सुरुवात केली. पालिकेकडून लवकरच ताबा प्रमाणपत्र देण्याबाबत हालचाली सुरू झाल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले आहे. एकूण या प्रश्नाला गती देण्यात येत असल्याचे म्हाडाने सांगितले. शिष्टमंडळात खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, सहाय्यक सेक्रेटरी मोहन पोळ होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -