Friday, April 26, 2024
Homeमहत्वाची बातमीसंजय राऊत यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा

संजय राऊत यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा

भाजप आमदार नितेश राणे यांनी केली मागणी

कणकवली: संजय राऊत यांनी काल खासदार श्रीकांत शिंदे तसेच संजय शिरसाट यांच्यावरुन पत्रकारांनी प्रश्न विचारला असता थुंकण्याचे कृत्य केले. यावर नितेश राणे यांनी त्यांचा समाचार घेत संजय शिरसाट यांचं नाव दलित समाजातून येतं. त्यांच्यावर देखील ते थुंकलेत. त्यामुळे, राऊतांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

नितेश राणे यांनी त्यांच्या खास शैलीत संजय राऊत यांचा समाचार घेत, संजय राऊत यांची जीभ सध्या वळवळते आहे. मुंबईतील एक महिला संजय राऊत यांच नाव घेतल्यावर अशीच थुकते. त्यामुळे संजय राऊत यांनी थुकण्याचे प्रकार बंद केले नाहीत तर सरकारला मी विनंती करतो की संजय राऊत यांचे संरक्षण काढावे आणि त्यानंतर त्याची जीभ किती वळवळते हे आपण पाहू, असे म्हटले.

संजय राऊत उद्धव ठाकरेंवर थुकले

ते पुढे म्हणाले संजय राऊत हे खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांच्यावर थुकले आहेत. ज्या मालकाच्या पगारावर याचं घर चालत ते पवार साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांना वर्षावर भेटले. हे सरकार झाल्यापासून सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य नाही हे म्हणण्याऱ्या त्यांच्या मालकावरच ते थुंकले आहेत. तुमची महाविकास आघाडीमध्ये काय किंमत आहे हे काल शरद पवार यांनी दाखवून दिले आहे.

राजकीय लव्ह जिहाद

यावेळी त्यांनी संजय राऊत यांचा राजकीय लव्ह जिहाद झाला आहे, असे म्हटले. ज्या राहुल गांधींचे ते तळवे चाटतात त्यांनी काल मुस्लीम लीगला सेक्युलर म्हटलं आहे. तुमच्यासारख्या टेबल पत्रकारांनी मुस्लीम लीगचा इतिहास वाचावा. भाजपवर थुकण्याचं कृत्य करता मग सामनाच्या पहिल्या पानावर जाहीरात का घेतली असा सवाल त्यांनी उपस्थित केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -