Sunday, April 28, 2024
Homeदेशपंजाब काँग्रेसला मोठा झटका, लुधियानामधून खासदार रवनीत सिंह बिट्टूंनी पकडला भाजपचा हात

पंजाब काँग्रेसला मोठा झटका, लुधियानामधून खासदार रवनीत सिंह बिट्टूंनी पकडला भाजपचा हात

नवी दिल्ली: पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीआधी(loksabha election 2024) काँग्रेसला(congress) मोठा झटका बसला आहे. लुधियाना येथून खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी भाजपचा हात धरला आहे. रवनीत हे दिवंगत माजी सीएम बेअंत सिंह यांचे नातू आहेत. त्यांना राहुल गांधींच्या जवळचे मानले जात होते.

दिल्लीस्थित भाजपच्या मुख्यालयात रवनीत सिंह बिट्टूने पक्षाचे सदस्यत्व घेतले. नुकतेच दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर त्यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली होती आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना निशाण बनवले होते.

रवनीत सिंहने आपल्या एक्स पोस्टमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनी लिहिले होते की केजरीवाल अँड पीर्टी स्वराज आणि जनलोकपालचे वचन देत सत्तेत आले होते. मात्र ही विडंबना झाली. दिल्लीत भ्रष्टाचारचे हे प्रकरण म्हणजे केवळ सुरूवात आहे.

तीन वेळचे खासदार आहेत रवनीत सिंह बिट्टू

रवनीत सिंह यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास ते तीन वेळा खासदार झाले. २०१४ आणि २०१९मध्ये ते लुधियाना येथून निवडून आले होते. तर २००९मध्ये काँग्रेसने त्यांना आनंदपूर साहिब येथून तिकीट दिले होते. तेथेही त्यांनी विजय मिळवला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -