Tuesday, May 7, 2024
Homeमहत्वाची बातमीParis Violence: फ्रान्समध्ये हिंसाचारात ८७५ आंदोलकांना अटक

Paris Violence: फ्रान्समध्ये हिंसाचारात ८७५ आंदोलकांना अटक

पॅरीस: फ्रान्समध्ये (France) तिसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरूच आहे. १७ वर्षीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी शेकडो लोक निदर्शने करत असून आंदोलकांनी वाहने, दुकाने, शाळा आणि सार्वजनिक वाचनालयाला आगी लावल्या आहेत.

आंदोलकांनी पोलिसांवर फटाकेही फेकले. फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने रस्त्यावर ४० हजार पोलिस तैनात केले आहेत. आतापर्यंत ८७५ आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. यातील बहुतांश आंदोलक हे १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन आहेत.

२७ जून रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसच्या उपनगरी भागात असलेल्या नॅनटेरे येथे ट्रॅफिक सिग्नलवर न थांबल्याने १७ वर्षांच्या नाहेल या मुलाला पोलिसांनी गोळ्या घातल्या. तेव्हापासून फ्रान्समध्ये हिंसाचार सुरूच आहे. आंदोलकांनी ३ दिवसांत ४९२इमारतींचे नुकसान केले आहे. २ हजार वाहने जाळली. इतर ३८८०ठिकाणी जाळपोळ झाली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -