Tuesday, May 7, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस-वे'वरील अपघातात ५ जणांचा मृत्यू

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वरील अपघातात ५ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस-वे) (Mumbai-Pune Expressway) मध्यरात्री बोरघाटात झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. तिघे जण जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने निघालेल्या या इर्टिगा गाडीला दुसऱ्या एका वाहनाने धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला.

या धडकेमुळे गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली आणि दरवाजा तुटल्याने प्रवासी बाहेर पडले. अति रक्तस्त्रावामुळे काहींचा मृत्यू झाला. सगळे मृत व्यक्ती एकाच कुटुंबातले असल्याचे प्राथमिक माहिती हाती येत आहे.

जखमींना पनवेलमध्ये एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याच महामार्गावरुन जाणाऱ्या व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली आणि जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

हे पण वाचा : राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे मविआ फुटण्याच्या उंबरठ्यावर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -