Nashik Crime News : तुम्ही सुद्धा तुमच्या अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास देत असाल तर थांबा असं करू नका नाहीतर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या (Deolali Camp Police Station) हद्दीत देखील १५ वर्षांच्या मुलाला चारचाकी (कार) चालवण्यास देणे वडिलांना महागात पडले आहे. निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासह, त्याला गाडी (Car) चालवण्यास देणाऱ्या त्याच्या वडिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Jalgaon News : जळगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके गावातील पिता-पुत्र नर्मदा नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना ...
नेमकं प्रकरण काय ?
२६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी देवळाली कॅम्प येथील गरीबदास मिठाईवाला दुकानाजव पंधरा वर्षीय मुलगा मुलगा व्हेंटो कार सार्वजनिक रस्त्यावर वेगाने व निष्काळजीपणे चालवत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. बरं हा चालक मुलगा अल्पवयीन होत, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला दुखापत होण्याची शक्यता निर्माण होती. हीच बाब लक्षात घेऊन हवालदार सचिन बोरसे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. यावरून मुलाचे वडील संशयित वसीम युसूफ शेख (वय ४३, रा. हाऊसन राेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik Crime : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२६च्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि पॅरामेडिकल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. याच संधीचा ...
गर्दीचा फायदा घेत दोन महिलांचे मंगळसूत्र चोरी
दरम्यान दुसरीकडे निमाणी बस स्थानकावरून (Nimani Bus Stand) बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत दोन महिलांच्या गळ्यातील तब्बल ६० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगळसूत्रे शिताफीने लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchvati Police Station) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.