Nepal-Tibet Flood : नेपाळ-तिबेट पूरस्थितीत महाराष्ट्रातील ४०४ नागरिक अडकले; ३३८ जणांशी संपर्क

रायगड : नेपाळ-तिबेट परिसरात २६ ऑगस्ट रोजी आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, महाराष्ट्रातील ४०४ नागरिक या भागात अडकले आहेत. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत यापैकी ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून ते सुरक्षित असल्याची माहिती महाराष्ट्राच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. (Nepal-Tibet Flood)


अडकलेल्या नागरिकांपैकी ६० जण ‘रिचा टूर्स प्रा. लि.’ या संस्थेमार्फत प्रवासाला गेले होते. या गटाशी अद्याप थेट संपर्क होऊ शकलेला नाही. तसेच अन्य सहा नागरिकांची माहिती वेब लिंकद्वारे प्राप्त झाली असून, त्यांच्याशीही संपर्क साधता आलेला नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Nepal-Tibet Flood)



दरम्यान, ४०४ सुरक्षित नागरिकांपैकी नागपूरमधील १०५ नागरिक भारतात परतले आहेत. तसेच ३७ नागरिक सागा (मानसरोवरजवळ) येथून भारताच्या दिशेने रवाना झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन-तिबेट परिसरात असलेल्या भारतातील १४९ नागरिकांची यादी महाराष्ट्राला प्राप्त झाली असून, या नागरिकांची माहिती संबंधित जिल्ह्यांकडून वेगाने संकलित व पडताळली जात आहे. (Nepal-Tibet Flood)


महाराष्ट्र राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने (SEOC) अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित केली आहे. ही लिंक सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आली असून माध्यमांद्वारेही तिचा प्रसार करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाशी सातत्याने समन्वय साधला जात असून, आवश्यक बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. हरवलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. (Nepal-Tibet Flood)


अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीय आणि प्रवासी संस्थांशी हेल्पलाइनद्वारे संपर्क ठेवण्यात येत आहे. परिस्थितीची अद्ययावत माहिती गृह मंत्रालयाच्या आपत्कालीन प्रतिसाद नियंत्रण कक्षासह परराष्ट्र मंत्रालय आणि महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांना देण्यात येत आहे. (Nepal-Tibet Flood)

Comments
Add Comment

Trump Venezuela Oil Deal : ट्रम्प यांची मोठी घोषणा! व्हेनेझुएलाच्या तेलसाठ्यावर अमेरिकेचं वर्चस्व; पेट्रोलच्या किमती कमी होणार?

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मोठ्या ऊर्जा कराराची घोषणा करत खळबळ उडवून दिली

Nepal Flood : नेपाळमधील महापुराचा भारताला फटका, जलविद्युत प्रकल्पांच्या ऊर्जा निर्मितीवर परिणाम

काठमांडू : भारत आणि नेपाळ यांच्यात ऊर्जा सहकार्य करार आहे. या करारांतर्गत नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पांमधून

Nepal Flood : नेपाळवर घोंगावत आहे पुन्हा महापुराचे संकट

काठमांडू : हिमस्खलन झाले, नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि नेपाळमध्ये अचानक महापूर (Flash Flood) आला. या संकटातून

Mohan Bhagwat : मोहन भागवतांना विरोध करणाऱ्या ममदानींचे संघांने टोचले कान, आयोजकांचे एक्स अकाऊंटही पुन्हा सुरू

न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दृष्टी आणि विचारसरणी यांविषयी अधिक जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या

Tibet dam failure alert : चिखलात बेपत्तांचा शोध अन् मदतकार्य सुरु असतानाच पुन्हा धडकी भरवणारा इशारा; तिबेटमध्ये पाण्याचा बांध फुटल्याची भीती

नेपाळ : नेपाळमध्ये तिबेटच्या हिमकडा कोसळण्याने आलेल्या भीषण फ्लॅश फ्लडच्या विनाशातून सावरण्याचा प्रयत्न सुरू

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात