Thane : ठाणे शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना समोर आली आहे. दुचाकीवरून घरी परतत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने एका ४२ वर्षीय वकिलाचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेमुळे ठाणे वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
दुबई : भारतीय महिला क्रिकेट संघ थायलंडविरुद्ध महिला आशिया कप टी-२० स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. गेल्या दशकात भारताने आशिया कपवर वर्चस्व ...
नेमकी घटना कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हा बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन श्रीपत तांबे हे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कासार अली येथे वर्तमानपत्र खरेदी करण्यासाठी गेले होते. तिथून आपले काम आटोपून ते दुचाकीने घरी परतत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ॲड. नितीन तांबे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याचे आणि ते अचानक रस्त्यावर कोसळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही दुर्घटना घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या कोलकात्याच्या अलीपूर येथील प्रेसिडेन्सी सेंट्रल जेलमध्ये पुन्हा एकदा गंभीर सुरक्षा त्रुटी ...
उपचारापूर्वीच प्राण पिसू गळाले
नागरिकांच्या मदतीने तांबे यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच किंवा उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत ॲड. नितीन तांबे हे सुप्रसिद्ध पालिका कामगार नेते श्रीपत तांबे यांचे ज्येष्ठ पुत्र होते. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे ठाण्यातील वकील वर्गासह सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.