Jalgaon News : जळगावमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खडके गावातील पिता-पुत्र नर्मदा नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये वडील गणेश शांताराम पाटील (३६) यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे. मात्र त्यांचा ११ वर्षांचा मुलगा लकी गणेश पाटील याचा अजूनही बेपत्ता आहे. मुलाचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात मोहीम सुरू आहे. लेकाला वाचवण्यासाठी मदतीला धावणाऱ्या वडिलांनाच काळाने हिरावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर मुलगा अजूनही बेपत्ता असल्याने पाटील कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. (Jalgaon News)
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सर्वत्र रक्षाबांधन या भाऊ- बहिणीच्या सणाचा उत्साह असताना जळगावमध्ये मन सुन्न करणारी घटना ...
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, खडके गावातील रहिवासी असलेले गणेश पाटील कुटुंबासह इतर काही कुटुंबा समवेत १९ ऑगस्ट रोजी जबलपूरजवळ नर्मदा नदीच्या काठावर असलेल्या एका आश्रमात गेले होते. सुनील महाराज उर्फ सोनू महाराज यांच्या या आश्रमात नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांसाठी अनेक वर्षांपासून अन्नदान केले जाते. याच कारणामुळे परिसरातील अनेक भाविक या ठिकाणी भेट देतात. दरम्यान, सर्वजण नदीत स्नान करण्यासाठी गेले होते. आंघोळ झाल्यानंतर लकी नदीच्या बाहेर आला. मात्र काही वेळाने त्याच्या पायाला माती लागल्याचे त्याला जाणवले. ती माती काढण्यासाठी तो पुन्हा पाण्याजवळ गेला अन् नियतीने डाव साधला. पाय धुण्यासाठी गेलेला लकी नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पुढे गेला असता अचानक त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला.(Jalgaon News)
Jalgaon : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, जबलपूर-कोयंबतूर मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीचे आता नियमित मेल/एक्सप्रेस ...
बचाव पथकाने नदी परिसरात शोध सुरू
नदीचा प्रवाह वेगात असल्याने लकीला स्वतःला सावरण्याची संधी मिळाली नाही आणि तो पाण्यासोबत वाहून जाऊ लागला. मुलाला संकटात पाहून वडील गणेश पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता त्याला वाचवण्यासाठी नदीत उडी घेतली. मात्र, पाण्याचा जोर इतका जास्त होता की गणेश पाटील हे देखील नदीच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने नदी परिसरात शोध सुरू केला. काही काळाच्या प्रयत्नानंतर गणेश पाटील यांचा मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र लकीचा अद्याप शोध लागलेला नाही. लकीचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून नदीच्या परिसरात शोध मोहीम सुरु आहे. या घटनेची बातमी खडके गावात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात घडलेल्या या दुर्घटनेने पाटील कुटुंबियांवर आभाळ कोसळले आहे.
तलवारे कुटुंबियांवरही दुःखांचा आघात
दरम्यान,जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) तालुक्यातील खवशी (Khavshi) येथे देखील दोन दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. गाव तलावाच्या पाण्यात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. विरेंद्र उर्फ विरु अण्णा तलवारे (७) आणि त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे (३२) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने खवशी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.