Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये सुमारे 290 भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. तर चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेट भागात सुमारे 200 भारतीय नागरिक अडकले आहेत. या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी भारतीय प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. (Nepal Flood)
नेपाळमध्ये संपर्क तुटलेल्या भारतीय नागरिकांमध्ये विविध राज्यांतील पर्यटक आणि वीज प्रकल्पात काम करणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. त्रिशुली-1 वीज प्रकल्पात 73 भारतीय नागरिक कार्यरत असून, प्रकल्प प्रमुखाशी संपर्क असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे या नागरिकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. ( Nepal Landslide)
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी जोरदार पावसासाठी ...
तामिळनाडूतील दोन वेगवेगळ्या गटांमधील एकूण 86 नागरिकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यातील 37 आणि 49 नागरिकांचे गट अनुक्रमे सम्राट ट्रॅव्हल्स आणि फ्लाय एव्हरेस्ट ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नेपाळमध्ये गेले होते. पश्चिम बंगालमधील 32 नागरिकांचा एक गट रसुवा जिल्ह्यातील तिमुरे येथे गेला होता. त्यांच्याशीही संपर्क तुटला आहे. ( Nepal China Border)
याशिवाय, रिचा टूर्सच्या माध्यमातून केउंग परिसरात गेलेले विविध राज्यांतील 61 भारतीय नागरिक आणि केरळमधील 33 नागरिकही संपर्काबाहेर आहेत. भारतीय दूतावास स्थानिक प्रशासन आणि संबंधित टूर ऑपरेटर्सच्या मदतीने या नागरिकांचा शोध घेत आहे. (Nepal Flood News)
दरम्यान, चीनच्या तिबेट भागात अडकलेले सुमारे 200 भारतीय नागरिक सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. दारचेनमध्ये सुमारे 95, जिलॉन्गमध्ये 4 आणि झुतुलफुकमध्ये सुमारे 30 भारतीय नागरिक आहेत. याशिवाय 60 ते 70 नागरिक सागाच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालय नेपाळ आणि चीनमधील संबंधित प्रशासन, भारतीय दूतावास, राज्य सरकारे आणि टूर ऑपरेटर्सच्या संपर्कात आहे. अडकलेल्या नागरिकांचा ठावठिकाणा शोधून त्यांना शक्य तितक्या लवकर सुरक्षितपणे भारतात परत आणण्याला प्राधान्य दिले जात आहे. (Flood News)






