मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 770 रुपयांची घट झाली असून, 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,62,980 रुपयांवर आला आहे. त्यामुळे सोने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Gold rate)
अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचे सांगितले जात आहे. मागील आठवडाभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. आता दर कमी झाल्याने लग्नसराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने घेणाऱ्यांसाठी ही घसरण महत्त्वाची ठरू शकते. मात्र, सोन्याचे दर बाजारातील परिस्थितीनुसार सतत बदलत असल्याने खरेदीपूर्वी ताजे दर तपासणे आवश्यक आहे. (Mumbai Gold Rate)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अमेरिकन डॉलर आणि बॉंड यील्डमध्ये झालेली घसरण, तसेच जागतिक बाजारातील ...
आजचे 24 कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम - 16,298 रुपये 8 ग्रॅम - 1,30,384 रुपये 10 ग्रॅम - 1,62,980 रुपये 100 ग्रॅम - 16,29,800 रुपये
आजचे 22 कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम - 14,940 रुपये 8 ग्रॅम - 1,19,520 रुपये 10 ग्रॅम - 1,49,400 रुपये 100 ग्रॅम - 14,94,000 रुपये
आजचे 18 कॅरेट सोन्याचे दर
1 ग्रॅम - 12,224 रुपये 8 ग्रॅम - 97,792 रुपये 10 ग्रॅम - 1,22,240 रुपये 100 ग्रॅम - 12,22,400 रुपये
दरम्यान, सोन्याच्या किमतीत झालेली आजची घसरण कायम राहील की पुन्हा दर वाढतील, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात पुन्हा चढ-उतार होण्याची शक्यता आहे.






