Thursday, August 27, 2026

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

Kriti Sanon Rakhi Ad : कृती सेनॉनच्या राखी जाहिरातीचा वाद चिघळला; सोनू निगमच्या नावाने फेक पोस्ट अन् मोठा ट्विस्ट!

मुंबई : कृती सेनॉनच्या राखीच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. GIVAच्या या जाहिरातीत कृती सेनॉन इंडो-वेस्टर्न पोशाखात भावाला आणि आपल्या पाळीव कुत्र्याला राखी बांधताना दिसली. जाहिरातीतील पोशाख आणि मांडणीवर सोशल मीडियावरून मोठी टीका झाली. अभिनेत्री कंगना रणौतनेही कृतीच्या पोशाखावर सवाल उपस्थित केला.

मात्र, या वादात सर्वाधिक चर्चा झाली ती गायक सोनू निगमच्या नावाने व्हायरल झालेल्या एका पोस्टची. या पोस्टमध्ये महिलांनी काय घालावं हा मुद्दा नसून, दुहेरीपणा आणि हिंदू सणांच्या परंपरांवर प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नांवर आक्षेप असल्याचं म्हटलं होतं. हिंदू परंपरा आणि धार्मिक भावनांचा आदर करण्याची गरज असल्याचंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं.

पण इथेच मोठा ट्विस्ट आला! सोनू निगमने स्वतः ही पोस्ट आपली नसल्याचं स्पष्ट केलं. अधिकृत Instagram अकाऊंटवर या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर करत त्याने, “This is not me and this has never been me” असं स्पष्ट केलं. म्हणजेच, सोनू निगमच्या नावाने X वर असलेल्या एका अकाऊंटवरून हे वक्तव्य करण्यात आलं होतं. मात्र, सोनू निगमने याबाबत स्पष्टता व्यक्त केली.

 
View this post on Instagram
 

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

आता या प्रकरणात गायिका प्राजक्ता शुक्रे हिनेही सोनू निगमला पाठिंबा दिला आहे. प्राजक्ताने प्रश्न उपस्थित केला की, सोनू निगमने वर्षानुवर्षे आपण X किंवा ट्विटरवर नसल्याचं स्पष्ट केलं आहे, तरीही त्यांच्या नावाने हे अकाउंट का चालवलं जात आहे? ती म्हणाली की, मुद्दा त्या पोस्टमधील मतांशी सहमत-असहमत असण्याचा नाही, तर ओळख आणि जबाबदारीचा आहे. बनावट ओळख वापरून एखाद्याच्या नावाने वैयक्तिक मतं मांडली जात असतील, तर त्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल तिने उपस्थित केला.

दरम्यान, या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर GIVAने कृती सॅनॉनची ही जाहिरात हटवली आहे. वाढत्या टीकेनंतर कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नसल्याचं ब्रँडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तर एका जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता कृती सॅनॉन, कंगना रणौत, सोनू निगम यांच्या नावाने व्हायरल झालेली बनावट पोस्ट या सगळ्याच कारणांमुळे चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >