Wednesday, August 26, 2026

Salman Khan : रोमँटिक हिरो ते ‘भाई’! सलमान खानच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास

Salman Khan : रोमँटिक हिरो ते ‘भाई’! सलमान खानच्या ३८ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास

एक अभिनेता ज्याने जवळपास चार दशकं बॉलिवूड गाजवलं, अनेक चढ-उतार अनुभवले आणि तरीही त्याचं नाव ऐकताच थिएटरमध्ये टाळ्यांचा आवाज घुमतो… हा प्रवास आहे अभिनेता सलमान खानचा! २६ ऑगस्ट २०२६ रोजी सलमान खान फिल्म्सने त्याच्या बॉलिवूडमधील ३८ वर्षांच्या प्रवासाला खास व्हिडिओद्वारे उजाळा दिला. सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’मधून पदार्पण केलं. पण खरी ओळख मिळाली ती १९८९ मधील ‘मैने प्यार किया’मधून. रोमँटिक भूमिकेतला हा तरुण अभिनेता पाहता पाहता देशाचा ‘भाई’ बनला. (Salman Khan)

त्यानंतरचा प्रवास मात्र एका इमेजमध्ये अडकू दिला नाही. ‘हम आपके हैं कौन..!’, ‘करण अर्जुन’, ‘हम दिल दे चुके सनम’मधून तो रोमँटिक हिरो म्हणून तरुणींच्या मनात घर करून गेला. तर ‘वॉन्टेड’ आणि ‘दबंग’मधून अॅक्शन स्टार म्हणून घराघरात पोहोचला. त्यानंतर ‘बजरंगी भाईजान’ व ‘सुलतान’मधून त्याने आपल्या अभिनयाची वेगळी छटा उमटवली.

सलमान खान अनेकदा त्याच्या अभिनयासोबतच काही वादांमुळेही चर्चेत राहिला. काळवीट शिकार प्रकरण, 2002 चं हिट-अँड-रन प्रकरण, ऐश्वर्या रायसोबतचा वाद, विवेक ओबेरॉय पत्रकार परिषद वाद आणि ‘बिग बॉस’शी संबंधित अनेक प्रसंग त्याच्या नावाशी जोडले गेले. (Salman Khan)

मात्र या वादांसोबतच 'Being Human Foundation'च्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सामाजिक उपक्रमही त्याच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाचा भाग राहिले. टेलिव्हिजनवर ‘बिग बॉस’च्या माध्यमातून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आणि मोठ्या पडद्यावर आजही त्याची वाटचाल सुरूच आहे. आता त्याचा आगामी अॅक्शन चित्रपट ‘मॉन्स्टर’ चर्चेत आहे.

३८ वर्षं, असंख्य भूमिका, अनेक वाद, प्रचंड चाहतावर्ग आणि एक अशी स्टार पॉवर जी पिढ्या बदलल्या तरी कायम राहिली. सलमान खानचा प्रवास म्हणजे फक्त एका अभिनेत्याची कारकीर्द नाही… तो बॉलिवूडच्या बदलत्या इतिहासाचा एक भाग आहे. (Salman Khan)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >