Nashik : ट्रकला ओव्हरटेक करणं महागात पडलं, दुचाकी घसरून ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Nashik : अंबड लिंक रोडवरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेमुळे घडलेल्या अपघातात ५४ वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागलाय. चुंचाळे फाटा येथील मीना ट्रेडर्सजवळ ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकी घसरून हा अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीवर मागे बसलेले सुनील दादाजी बोरसे (५४, रा. अशोकनगर, सातपूर) यांचा मृत्यू झालाय. गेल्या तीन महिन्यांत अंबड लिंक रोडवरील विविध अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याने रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Nashik Accident News)



नेमकं काय घडलं ?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास ईश्वर उकरडू जगताप (४०, रा. श्रमिकनगर, सातपूर) हे दुचाकीवरून सुनील बोरसे (Sunil Dadaji Borse) यांना मागे बसवून पपया नर्सरीकडून एक्सलो पॉईंटच्या दिशेने जात होते. चुंचाळे फाटा येथील मीना ट्रेडर्सजवळ ट्रकला (एमएच १४ ईएम ७९७७) डाव्या बाजूने ओव्हरटेक करत असताना दुचाकी अचानक रस्त्यावर घसरली. दुचाकी घसरल्यानंतर दोघेही रस्त्यावर पडले आणि त्यांना ट्रकची धडक बसली. या अपघातात सुनील बोरसे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Nashik Accident News)



एकाचा मृत्यू, एक जखमी


मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुचाकीचालक ईश्वर जगताप हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अंबड लिंक रोडवर ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. मात्र, खोदकामानंतर रस्त्याची योग्य पद्धतीने डागडुजी न झाल्याने मार्गावर ठिकठिकाणी खड्डे, चिखल आणि मातीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या मार्गावर किरकोळ अपघातांचे प्रमाणही वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Nashik Accident News)



तीन महिन्यांत चार बळी


अंबड लिंक रोडवरील दुरवस्थेमुळे गेल्या तीन महिन्यांत झालेल्या विविध अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. रस्त्यावरील खड्डे आणि चिखलामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. त्यामुळे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून महापालिका (Nashik Municipal Corporation)  मृत सुनील बोरसे यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ९५ टक्के; मुंबई आता सुरक्षित कक्षेत

- पाणीकपात रद्दचा निर्णय १ ऑक्टोबर नंतरच मुुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील

Bhuleshwar Cha Raja : भुलेश्वरच्या राजा मूर्ती दुर्घटनेचा तपास सुरू; शिल्पकार अनिकेत देसाईंचा पोलिसांनी नोंदवला जबाब

मुंबई : मुंबईतील भुलेश्वरच्या राजा गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान मूर्ती कोसळून दोन मंडळ पदाधिकाऱ्यांचा

Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीला ओळख नोंद न करता लॉजमध्ये रूम, मॅनेजरसह तरुणाला अटक

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीला कोणतीही ओळख नोंद किंवा आवश्यक पडताळणी न करता लॉजमध्ये रूम उपलब्ध करून दिल्याप्रकरणी

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी