Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, मार्च २०२७ पासून एलीट महिला क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आपण पात्र असल्याचा दावा अनायाने केला आहे. त्यामुळे भविष्यात तिला ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित महिला बिग बॅश लीग (WBBL) मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. (Anaya Bangar)


मुंबईत वयोगटातील क्रिकेट खेळलेल्या अनायाला ट्रान्सजेंडर म्हणून संक्रमणाच्या प्रक्रियेनंतर काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये उतरण्याची शक्यता तिच्यासाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याचे तिने म्हटले आहे. (Anaya Bangar)



क्रिकेटमध्ये पुनरागमनाची संधी :


आपण पुन्हा क्रिकेट खेळू शकणार असल्याचे समजल्यानंतरचा दिवस आयुष्यातील मोठा दिवस असल्याचे अनायाने सांगितले. एक काळ असा होता की पुन्हा क्रिकेट खेळता येईल की नाही, याबाबतच शंका निर्माण झाली होती. मात्र, आता पुन्हा मैदानावर उतरण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे आभार मानले आहेत. (Anaya Bangar)



क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धोरणांतर्गत पात्रता :


अनायाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘एलीट क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या समावेशाच्या धोरणा’ अंतर्गत पात्रता मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेटमध्ये खेळण्याचा मार्ग तिच्यासाठी खुला झाला आहे. मात्र, पात्रता मिळणे म्हणजे WBBL फ्रँचायझीकडून थेट करार मिळण्याची हमी नाही. त्यामुळे अनायासमोर आता स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान असेल. (Anaya Bangar)



WBBL मध्ये खेळण्याची संधी कशी मिळणार?


WBBLमध्ये परदेशी खेळाडूंसाठी ड्राफ्ट आणि कराराची प्रक्रिया आहे. फ्रँचायझी उपलब्ध आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पूलमधून खेळाडूंची निवड करू शकतात. तसेच ड्राफ्टपूर्वी आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत थेट करार करण्याचीही व्यवस्था आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मिळालेली पात्रता ही अनायासाठी पहिली पायरी ठरणार आहे. त्यानंतर तिला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करून आपली कामगिरी सिद्ध करावी लागेल. चांगली कामगिरी केल्यास WBBL फ्रँचायझींचे लक्ष तिच्याकडे वेधले जाऊ शकते. (Anaya Bangar)



कोण आहे अनाया बांगर?


अनाया बांगर (Anaya Bangar) ही माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची अपत्य आहे. तिचे आधीचे नाव आर्यन बांगर होते. मुंबईत शिक्षण घेतलेल्या अनायाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती.


तिने मुंबईतील डॉन बॉस्को शाळेत शिक्षण घेतल्यानंतर रिझवी कॉलेजमधून वाणिज्य शाखेचे शिक्षण घेतले. क्रिकेटमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने तिने इस्लाम जिमखाना येथे प्रशिक्षण घेतले. याच काळात तिने यशस्वी जैस्वाल, सरफराज खान आणि मुशीर खान यांच्यासोबत क्रिकेट खेळल्याचे सांगितले जाते. आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या धोरणांतर्गत पात्रता मिळाल्यानंतर अनाया पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटच्या मैदानावर परतण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे तिच्या पुढील क्रिकेट प्रवासाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Anaya Bangar)

Comments
Add Comment

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीत ICC चा बडगा सुरूच; खात्यात जमा झाला डिमेरिट पॉईंट

Colombo : भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने जर्सीवर टेप लावून तो नंबर का लपवला? चाहतेही चक्रावले, उलटसुलट चर्चांना उधाण

भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) सध्या दुलीप ट्रॉफीतील पदार्पणामुळे चर्चेत आहे. अवघ्या १५