Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला बसून कीर्तन करणाऱ्या भाविकांना भरधाव कारने चिरडले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. (Bihar Accident)


मिळालेल्या माहितीनुसार, सहा जण रस्त्याच्या कडेला बसून कीर्तन करत होते. त्याचवेळी भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, कार सुमारे ५० मीटर पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात घुसली. (Accident News)



अपाघतग्रस्त मृतांची नावे समोर


या अपघातात टिलो दास (६५), राजो दास (५०) आणि सुरेंद्र यादव (४५) यांच्यासह एकूण ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. मृतांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी रुग्णालयाच्या परिसरात संताप व्यक्त केला. पोलिस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.



कार पोलिसांच्या ताब्यात


पिपरा पोलिसांनी अपघातग्रस्त कार ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे. वाहनाचा वेग किती होता आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कशामुळे सुटले, याचा तपास पोलीस करत आहेत.


दरम्यान, सुपौलचे जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. प्रशासनाकडून बाधित कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जात आहे.


Comments
Add Comment

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण