Mumbai Water Stock : मुंबईचा पाणी साठा ९५ टक्के; मुंबई आता सुरक्षित कक्षेत

- पाणीकपात रद्दचा निर्णय १ ऑक्टोबर नंतरच


मुुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा आता वाढला असून हा पाणीसाठा आता मुंबईकरांच्या सुरक्षित कक्षेत आला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या एकूण पुरवठ्याच्या सुमारे ९६ टक्के पाणीसाठा आहे. मात्र, अलनिनोचे सावट अद्यापही कायम असल्यामुळे मुंबईकरांना पुढील एक महिना तरी पाणीकपातीतून सुटका होणार नाही. (Mumbai Water Stock)


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानासा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी धरणात सध्या वर्षभराच्या एकूण मागणीच्या म्हणजे १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या तुलनेत १३ लाख ८५ हजार ४४७ दशलक्ष लिटर पाण्याच्या साठा जमा झाला आहे. त्यामुळे एकूण पाणी साठ्याच्या ९५.७२ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. (Mumbai Water Stock)



मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांपैंकी मोडक सागर, तानसा, विहार, तुलशी आदी चार धरणे भरली असून सर्वांत मोठ्याप्रमाणात पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचा पाणी साठा हा ९५.७३ टक्के आहे तर मध्य वैतरणाचा पाणीसाठा ९६.४८ टक्के तर अप्पर वैतरणा ८९.७६ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. (Mumbai Water Stock)


महापालिका जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अलनिनोचे सावट अद्यापही कायम असून १० जुलै रोजी पाणीसाठा हा ८० टक्के होता आणि त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी हा पाणी साठा सुमारे ९६ टक्के एवढा आहे. त्यामुळे दीड महिन्यांमध्ये केवळ १६ टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे दीड महिन्यांमध्ये वापरला गेलेला आणि वाढलेला पाणी साठा याचा विचार करता पुढील ३५ दिवसांमध्ये किती पाऊस पडतो आणि किती पाणीसाठा वाढतो यावर सर्वांचे लक्ष आहे. अल निनोचे सावट कायम असल्यामुळे पाऊस किती पडेल याचा पत्ता नाही. त्यामुळे जर तलाव क्षेत्रात पाऊस पडला नाही तर हा पाणीसाठा ८० टक्क्यांवर येवू शकतो आणि यामुळे पुढील वर्षभराची तहान भागवताना पुन्हा एकदा पुढील वर्षी कपात करून राखीव साठ्यातून पाणी उचलून मुंबईकरांची तहान भागवण्याची गरज भासू शकते. (Mumbai Water Stock)


त्यामुळे १ ऑक्टोबर रोजी पाण्याचा जो साठा असेल त्यावर वर्षभराच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जाते. त्यातच जर ऑक्टोबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडला तर तो बोनस साठा ठरतो. त्यामुळे तुर्तास तरी पाणीकपात मागे घेण्याचा विचार नसून तलावातील पाणी साठा पुरेसा जमा होईल याकडेच लक्ष असल्याचे बोलले जात आहे. (Mumbai Water Stock)



२५ ऑगस्ट रोजीचा मागील तीन वर्षांचा पाणी साठा :


सन २०२६ : १३ लाख ८५ हजार ४४७


सन २०२५ : १३ लाख ८९ हजार ९१३


सन २०२४ : १३ लाख ७८ हजार ८७७

Comments
Add Comment

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू

Tree Adoption Scheme : मुंबईत राबवली जाणार वृक्ष दत्तक योजना; महापालिका सभागृहात ठराव मंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नागरिक गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या सहभागातून आणि

Bhuleshwar Cha Raja : भुलेश्वरच्या राजा मूर्ती दुर्घटनेचा तपास सुरू; शिल्पकार अनिकेत देसाईंचा पोलिसांनी नोंदवला जबाब

मुंबई : मुंबईतील भुलेश्वरच्या राजा गणेश मूर्तीच्या आगमन सोहळ्यादरम्यान मूर्ती कोसळून दोन मंडळ पदाधिकाऱ्यांचा

Coastal Road-Sea Link Traffic Rules : मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकवर वाहतूक निर्बंध; 'या' वाहनांना कायमस्वरुपी बंदी

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) आणि राजीव गांधी

Mumbai Water Stock : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांत ९५.८३ टक्के पाणीसाठा; भातसा, तानसा, वैतरणा तलावांची स्थिती जाणून घ्या

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये एकूण १३,६८,९५८