हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यातील दुर्गमपुरम स्टेजजवळ भरधाव खासगी ट्रॅव्हल्स बसने पुढे जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ( Hyderabad Vijayawada Highway Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ५.२० वाजता हा अपघात झाला. खासगी ट्रॅव्हल्स बस ४३ प्रवाशांना घेऊन हैदराबादहून विजयवाड्याच्या दिशेने जात होती. बहुतांश प्रवासी झोपेत असतानाच दुर्गमपुरम स्टेजजवळ बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस समोरील ट्रकवर आदळली. ( Hyderabad Vijayawada Bus Accident)
मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टिटवाळा स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी २८ ...
धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. ( Highway Accident)
काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ( Hyderabad Vijayawada Highway)
दरम्यान, चालकाला झोप लागल्यामुळे अपघात झाला की बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता, याचा पोलीस तपास करत आहेत. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. (Death)