Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी केल्याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. यश धनुका अग्रवाल असे आरोपीचे नाव आहे. चोरी केल्यानंतर तो गुजरातमधील अहमदाबाद येथे पळून गेला होता. मात्र, त्याच्या वडिलांनी त्याला अहमदाबादहून परत आणून पोलिसांच्या ताब्यात दिले.  (Viral Story)

पोलिसांच्या माहितीनुसार, ही चोरी ११ ऑगस्ट रोजी झाली. त्यावेळी कुटुंबातील सदस्य घरी नव्हते. यशने आपल्या कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या खोलीतील लॉकर फोडून रोकड आणि सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. ( 50 Lakh Theft Case)


चोरीनंतर अहमदाबादला पळाला


घटनेनंतर पोलिसांनी सायबर सुरक्षा कक्षाच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीमध्ये कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीचा सहभाग असण्याचा संशय पोलिसांना आला. यशचा मोबाईल ट्रॅक केल्यानंतर तो अहमदाबादमध्ये असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याचे वडील अहमदाबादला गेले आणि त्याला जोरहाटला परत आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. (Viral News)

यशला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

'प्रेयसीवर ५ लाख रुपये खर्च केले'


पोलिसांच्या चौकशीत यशने चोरीच्या कटाबाबत धक्कादायक माहिती दिल्याचे समोर आले आहे. त्याने जीतू सोमानी आणि रोहित प्रसाद यांच्यासोबत मिळून चोरीची योजना आखल्याचे सांगितले. त्याच्या म्हणण्यानुसार, एका डिप्लीकेट चावी बनवणाऱ्याला बोलावून लॉकर उघडण्यात आला.

चोरी केलेल्या पैशांपैकी काही रक्कम त्याने प्रेयसीवर खर्च केल्याचा पोलिसांना संशय आहे. यशने पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने तिच्यावर सुमारे ५ लाख रुपये खर्च केले.

दरम्यान, तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की, त्याने प्रेयसीला सुमारे दीड लाख रुपयांचा आयफोन भेट दिला. तसेच तिला रोख रक्कम देण्यासोबतच हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये तिच्यासोबत काही दिवस घालवल्याचा आरोप आहे.

चोरीची संपूर्ण रक्कम आणि मौल्यवान वस्तूंचा नेमका किती भाग कुठे खर्च झाला, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. ( Son Robbed Own House)
Comments
Add Comment

Bihar Road Accident : कीर्तन सुरुच होतं... तेवढ्यात भयान घडलं! भरधाव कारने भाविकांना चिरडले; एकाच कुटुंबातील ५ जण जागीच ठार

बिहार : बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील NH-327E महामार्गावर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. बजरंगबली मंदिराजवळ

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण