Nashik : कांद्याच्या दरात वाढ, दर नियंत्रणासाठी ‘कांदा एक्स्प्रेस’ सुरू

Nashik : देशभरात कांद्याच्या दरात तब्बल ५९ टक्क्यांनी वाढ झाल्याने केंद्र सरकारने बाजारातील कांद्याचा पुरवठा वाढविण्यास सुरुवात केली आहे. दर नियंत्रणात आणण्यासाठी नाशिकमधून देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये समर्पित रेल्वे रेकद्वारे मोठ्या प्रमाणावर कांदा पाठविला जात आहे. ‘कांदा एक्स्प्रेस’च्या माध्यमातून हा कांदा विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



कांद्याचे दर ५९ टक्क्यांनी वाढले


नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (Agricultural Produce Market Committees) कांद्याची आवक घटल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याला सरासरी ४ हजार २५१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. वाढत्या दराचा परिणाम देशातील प्रमुख महानगरांमधील कांद्याच्या बाजारभावावरही झाला आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या माहितीनुसार, कांद्याच्या दरात ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारातील पुरवठा वाढविण्यासाठी केंद्र सरकारने नाशिकमधून प्रमुख ग्राहक केंद्रांकडे कांदा पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वे रेकमधील कांदा बुधवारी सायंकाळपर्यंत संबंधित बाजारपेठांमध्ये पोहोचण्याची अपेक्षा ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे.



कांदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा


दरम्यान, राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ अर्थात एनसीसीएफकडून मंगळवारी लासलगाव रेल्वे स्थानकातून (Lasalgaon Railway Station) ८४० टन कांदा पाठविण्यात येणार आहे. नाफेडकडूनही लवकरच कांदा पाठविण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. सरकारने ग्राहकांसाठी खरेदी केलेला कांदा बाजारातील व्यापाऱ्यांना विकण्याऐवजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी केली आहे. सरकारी कांदा खरेदी योजनेचा शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना अपेक्षित फायदा झाला नसून मोजक्या व्यापाऱ्यांनाच त्याचा लाभ झाल्याचा आरोप त्यांनी केला.



सरकारी खरेदीचे उद्दिष्ट अपूर्ण


केंद्र सरकारने दर स्थिरीकरण योजनेंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला मिळून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, खुल्या बाजारात चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी सरकारी खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, नाफेडला सुमारे ६० हजार मेट्रिक टन, तर एनसीसीएफला सुमारे ४० हजार मेट्रिक टन कांदा खरेदी करता आला आहे. सरकारी खरेदीतील कांद्याच्या प्रतवारीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, एनसीसीएफचा कांदा मंगळवारपासून देशांतर्गत बाजारात पाठविण्यात येणार असून, नाफेडकडूनही लवकरच ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. कांदा एक्स्प्रेसच्या माध्यमातून वाढीव पुरवठा बाजारात आल्यानंतर दर कितपत नियंत्रणात येतात, याकडे शेतकरी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Drug Bust : अरे बापरे...! तब्बल ३.५० कोटींचे अमली पदार्थ; आरोपीची 'ती' एक चूक नडली अन् पोलिसांची थेट धाड

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत ३०२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची

Ahilyanagar : पत्रकारावर जीवघेणा हल्ला, छत्रपती संभाजीनगरातून तिघे ताब्यात

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर शहरातील पत्रकार सुशील थोरात आणि त्यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला करून

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

UP T20 League Rinku Singh : ८-८ ओव्हरच्या सामन्यात रिंकू सिंहचा धुमाकूळ; ४१४.२९ च्या स्ट्राइक रेटने ठोकल्या २९ धावा!

UP T20 League Rinku Singh : यूपी टी२० लीग २०२६ मध्ये रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. स्पर्धेतील

BJP Vs Congress : राहुल गांधींच्या पत्रावर भाजपचा पलटवार

- आदिवासी शाळांमधील गैरकारभारासाठी काँग्रेस नेतेच जबाबदार; राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या मुद्यावर राजकारण

Ahilyanagar : सोन्याचे गंठण, चांदीचे सिंहासन लंपास, शेंडीतील मळगंगा देवी मंदिरात चोरी

Ahilyanagar : शेंडी (ता. अहिल्यानगर) येथील मळगंगा देवी मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्याने देवीच्या