Ahilyanagar : देशभरात श्रावण महिन्यानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. शिवमंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत आहे.अनेक ठिकाणी श्रवणानिमित्त उत्सव आणि यात्राही पाहायला मिळत आहेत. अशातच जामखेड येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. जामखेड येथील नागेश्वर यात्रोत्सवानिमित्त आयोजित आनंद मेळाव्यात शनिवारी रात्री अंगावर थरकाप उडवणारी घटना घडली आहे.(Ahilyanagar News)
मुंबई : वाहनाच्या मालकी हक्क हस्तांतरणासाठी तसेच ना हरकत प्रमाणपत्रासाठी देशभरात एकसमान व प्रमाणित ऑनलाइन कार्यप्रवाह लागू करण्यात आला आहे. या ...
नागेश्वर यात्रोत्सवानिमित्त आयोजित आनंद मेळाव्यात असलेल्या पाळण्यांमध्ये बसून भाविकांकडून आनंद साजरा केला जात होता. मात्र, येथील एका पाळण्यातील एका खुर्चीची लोखंडी सुरक्षा कडी अचानक उघडल्याने या पाळण्यात बसलेली तरुणी थेट उंचावरुन खाली पडल्याची भीषण घटना घडलीय. ही घटना घडताच तरुणीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असली तरी तिला गंभीर दुखापत झाली आहे. (Ahilyanagar News)
मुंबई : विले पार्ले पश्चिम येथे १८ ऑगस्ट रोजी घडलेल्या कथित हिट-अँड-रन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या १९ वर्षीय इंजिनिअरिंग विद्यार्थ्याची ₹५,००० जामीन ...
नेमकं काय घडलं ?
नागेश्वर यात्रोत्सवानिमित्त आयोजित आनंद मेळाव्यात असलेला एक पाळणा हवेत वेगाने फिरत असतानाच अचानक पाळण्यातील एका खुर्चीची सुरक्षा कडी उघडली आणि तरुणी थेट खाली कोसळली. पाळण्यातील एका खुर्चीची लोखंडी सुरक्षा कडी अचानक उघडल्याने या पाळण्यात बसलेली तरुणी थेट उंचावरुन खाली पडल्याची भीषण घटना घडलीय. ही घटना घडताच तरुणीला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असली तरी तिला गंभीर दुखापत झाली आहे. (Ahilyanagar News)
Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या कुंभमेळ्यात ...
या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तर, पाळणा सुरू करण्यापूर्वी सुरक्षा यंत्रणेची तपासणी झाली होती का ? संयोजकांकडून खबरदारी घेतली होती का, असा गंभीर सवाल उपस्थित झाला आहे. सुरक्षेतील एका चुकीमुळे तरुणीवर मोठे संकट कोसळता कोसळता राहिले.