Jalgaon : जळगाव-ममुराबाद मार्गावर भीषण अपघात, कावड यात्रेतील १० वर्षीय मुलाचा मृत्यू ; संतप्त जमावाने वाहन पेटवले

Jalgaon Accident News : जळगाव तालुक्यातील जळगाव–ममुराबाद रस्त्यावर म्हाळसादेवी मंदिराजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात कावड यात्रेत सहभागी झालेल्या १० वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चोपड्याकडे किराणा माल घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाने मुलाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या आयशर वाहनाला थेट आग लावल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.



नेमकी घटना काय ?


शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यातून कावड यात्रा म्हाळसादेवी मंदिराच्या दिशेने गेली होती. यात्रा आटोपल्यानंतर भाविक परतीच्या मार्गावर असताना जळगावकडून चोपड्याकडे किराणा माल घेऊन जाणाऱ्या एमएच २०/ईजी ३५९३ क्रमांकाच्या आयशर वाहनाने यात्रेत सहभागी असलेल्या मुलाला धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, वाहनाने मुलाला काही अंतरापर्यंत ओढत नेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच मुलाचे नातेवाईक, कावड यात्रेतील भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. चिमुकल्याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्ता अडवत चालकाला तातडीने ताब्यात घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई होईपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नसल्याची भूमिका जमावाने घेतली. (Jalgaon Accident News )



संतप्त जमावाने वाहन पेटवले


दरम्यान, संतप्त जमावातील काही जणांनी किराणा मालाने भरलेल्या आयशर वाहनाला आग लावली. वाहन पेटल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात केला. जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करताना तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांनाही किरकोळ धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे जळगाव–ममुराबाद मार्गावरील वाहतूक सायंकाळी सुमारे पाच ते साडेसात वाजेपर्यंत ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.(Jalgaon Accident News )



आयशर चालक ताब्यात


पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करून परिस्थिती शांत केली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांची समजूत घातल्यानंतर मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आयशर चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या दुर्घटनेमुळे कावड यात्रेत सहभागी भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, निष्पाप बालकाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

Maharashtra Farmers : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! देशी बैलजोडी खरेदीसाठी मिळणार १.२६ लाखांपर्यंत अनुदान; असा करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी देशी बैलजोडी

Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; ‘या’ ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे बरसणार मुसळधार?

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. अनेक भागांत पावसाने उघडीप

Chandrashekhar Bawankule : अमरावतीतील दुर्घटनेप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

मुंबई : अमरावतीतील रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून तांत्रिक त्रुटी, अग्निशमन यंत्रणेतील बिघाड,

Chhatrapati Sambhajinagar Suicide : "तुमच्या पुढच्या सात पिढ्या यातना भोगतील..." मृत आईच्या त्या शेवटच्या शापाने उघडकीस आले कौटुंबिक वादाचे सत्य?

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण

Pune Accident : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात बसमधून खाली पडल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; 'त्या' एका चुकीमुळे गेला जीव?

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या पीएमपीएमएल बसमधून अचानक तोल जाऊन खाली