UP T20 League Rinku Singh : यूपी टी२० लीग २०२६ मध्ये रिंकू सिंहने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली आहे. स्पर्धेतील १६व्या सामन्यात मेरठ मेव्हरिक्स आणि गोरखपूर लायन्स आमनेसामने होते. पावसामुळे हा सामना ८-८ ओव्हरचा करण्यात आला. मात्र, कमी षटकांच्या या सामन्यातही रिंकू सिंहने आपल्या तुफानी फलंदाजीने सामना गाजवला. (UP T20 League Rinku Singh)
रिंकूच्या नेतृत्वाखालील मेरठ मेव्हरिक्सने गोरखपूर लायन्सने दिलेलं ९२ धावांचं लक्ष्य अवघ्या ६.४ ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता गाठलं. रिंकू सिंहने केवळ ७ चेंडूंचा सामना करत २९ धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल ४१४.२९ इतका होता. (UP T20 League Rinku Singh)
रिंकूने ७ चेंडूत ठोकल्या २९ धावा :
पावसामुळे सामना ८ ओव्हरचा करण्यात आला होता. गोरखपूर लायन्सने प्रथम फलंदाजी करत ८ ओव्हरमध्ये ९१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मेरठची सुरुवात चांगली झाली. डावाच्या पाचव्या ओव्हरनंतर अक्षय दुबे रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला. त्यानंतर मेरठचा कर्णधार रिंकू सिंह फलंदाजीसाठी आला. त्यावेळी संघाला विजयासाठी शेवटच्या तीन ओव्हरमध्ये ३६ धावांची गरज होती. रिंकूने विशाल निषादच्या षटकात अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने ३ षटकार आणि २ चौकार लगावत त्या एका षटकात तब्बल २८ धावा कुटल्या. रिंकूने अवघ्या ७ चेंडूत २९ धावा करताना २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. (UP T20 League Rinku Singh)
कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळही वाद आणि नाट्यमय घडामोडींनी गाजला. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल ...
स्वास्तिक चिकारा याचीही तुफानी खेळी :
रिंकूसोबत दुसऱ्या बाजूला स्वास्तिक चिकारा यानेही आक्रमक फलंदाजी केली. त्याने केवळ २४ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. दोन्ही फलंदाजांच्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर मेरठने लक्ष्य सहज गाठलं. (UP T20 League Rinku Singh)
जीशान अन्सारीने पलटवला सामना :
याआधी गोरखपूर लायन्स फलंदाजी करत असताना ५ ओव्हरमध्ये ६३ धावा झाल्या होत्या. संघ सहज १०० धावांचा टप्पा गाठेल असं वाटत होतं. मात्र, सहाव्या ओव्हरमध्ये जीशान अन्सारीने सामन्याचं चित्र बदललं. जीशानने गोरखपूरचा कर्णधार आर्यन जुयाल आणि हरदीप सिंह यांना बाद करत संघाला मोठा धक्का दिला. त्याने सामन्यात २ ओव्हरमध्ये केवळ १० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. (UP T20 League Rinku Singh)
कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज असिथा फर्नांडो ...
मेरठ मेव्हरिक्सची विजयी घोडदौड :
रिंकू सिंहच्या नेतृत्वाखालील मेरठ मेव्हरिक्सने यूपी टी२० लीग २०२६ मध्ये आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. संघाने सहाही सामने जिंकत १२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. मेरठच्या वर्चस्वाचा अंदाज यावरून येतो की दुसऱ्या क्रमांकावरील लखनऊ फाल्कन्सनेही सहा सामने खेळले आहेत; मात्र त्यांच्या खात्यात केवळ ६ गुण आहेत. (UP T20 League Rinku Singh)