Tuesday, August 25, 2026

Nashik News : श्री कपालेश्वर मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला ! दानपेट्यांमध्ये 'इतके' लाख जमा

Nashik News : श्री कपालेश्वर मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला ! दानपेट्यांमध्ये 'इतके' लाख जमा

Nashik News : पवित्र श्रावण महिन्यानिमित्त नाशिकच्या प्रसिद्ध श्री कपालेश्वर महादेव मंदिरात (Kapaleshwar Temple) भाविकांनी दर्शनासाठी गर्दीच गर्दी केल्याचं पहायला मिळालं. महादेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान केले असून गेल्या तीन दिवसांच्या कालावधीत मंदिरातील प्रमुख तीन दानपेट्यांचे सील उघडून रकमेची गणती करण्यात आली आहे. दानपेट्यांमध्ये एकूण ५ लाख १ हजार ४५० रुपयांचा घसघशीत निधी (Funds) जमा झाला आहे.

कपालेश्वर मंदिरात लाखोंचे दान

​श्रावण महिन्यानिमित्त महादेव मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरात (Kapaleshwar Temple)  देखील भाविकांच्या दर्शनासाठी रांगाच रांगा लागल्याचे पहायला मिळाले. यावेळी अनेक भाविकांकडून मंदिरात असणाऱ्या दानपेट्यांमध्ये रोख रक्कम आणि विविध मौल्यवान चीजवस्तूंचे दान मोठ्या प्रमाणावर अर्पण केले. अवघ्या काही दिवसांतच मंदिरातील दानपेट्या पूर्ण भरल्याने संस्थानच्या विश्वस्तांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने ही मोजणी प्रक्रिया पार पडली भाविकांची वाढती संख्या आणि सुरक्षेचा उपाय म्हणून वेळोवेळी दानपेट्यांची मोजणी केली जाते. सील बंद पेट्या उघडून त्यातील रोख रक्कम, नाणी आणि इतर वस्तूंची मोजणी अधिकृत प्रतिनिधींच्या देखरेखीखाली झाली असून ही संपूर्ण रक्कम मंदिर संस्थानाच्या अधिकृत बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती श्री कपालेश्वर महादेव मंदिर संस्थानाने दिली आहे.

दानपेटीनिहाय रकम

१९ ऑगस्ट (दांडीच्या आतील मोठी दानपेटी) : पहिल्या दिवशी दांडीच्या आतील भागातील मुख्य दानपेटी उघडण्यात आली. या पेटीतून २ लाख १ हजार ७५० रुपये प्राप्त झाले.

२० ऑगस्ट (दांडीच्या बाहेरील संस्थानाची दानपेटी) : दुसऱ्या दिवशी बाहेरील प्रांगणातील दानपेटीची मोजणी करण्यात आली. यातून सर्वाधिक २ लाख २४ हजार ८०० रुपये जमा झाले.

२१ ऑगस्ट (सभामंडपातील लोखंडी दानपेटी) : तिसऱ्या दिवशी सभामंडपात ठेवण्यात आलेल्या लोखंडी दानपेटीतील रकमेची मोजणी पूर्ण झाली. या पेटीतून ७४ हजार ९०० रुपये रोख स्वरूपात मिळाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >