मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत ३०२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची बाजारातील किंमत सुमारे ३.५० कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याची ओळख पोलिसांनी अद्याप जाहीर केलेली नाही. (Mumbai News)
पोलिसांच्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचे सेवन, खरेदी-विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी एमआयडीसी पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी परिसरात गस्त घालत होते. (Mumbai Police)
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास ...
२३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१० वाजता जोगेश्वरी पूर्वेतील पूनम नगर परिसरात, हेमंत करकरे गार्डनसमोरील सहकारी भांडाराजवळ एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरताना पोलिसांच्या निदर्शनास आली. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, तो समाधानकारक उत्तरे देत नसल्याने त्याची झडती घेण्यात आली. (Crime News)
झडतीदरम्यान त्याच्याकडे ३०२ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. पोलिसांनी तत्काळ हे अमली पदार्थ जप्त करून संशयिताला अटक केली.
पोलीस कॉन्स्टेबल गौतम बाडे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात अंमली पदार्थ बाळगणे, विक्री आणि वाहतुकीच्या उद्देशाने अमली पदार्थांचा व्यापार करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Police)





