Tuesday, August 25, 2026

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडा) तब्बल ४,४६२ परवडणाऱ्या घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली असून, घरांच्या किंमती १३ लाख रुपयांपासून सुरू होत असल्याची माहिती आहे. (Pune News)

या सोडतीमध्ये पुणे महानगरपालिका हद्दीतील १,४६८ सदनिका, पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील १,४०६ सदनिका, तर पीएमआरडीए हद्दीतील १,५८८ सदनिकांचा समावेश आहे. ( MHADA Pune Lottery )

अर्जासाठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची अंतिम मुदत: १५ सप्टेंबर
  • अनामत रक्कम जमा करण्याची अंतिम मुदत: १६ सप्टेंबर
  • प्रारूप पात्र अर्ज यादी: २९ सप्टेंबर
  • दावे आणि हरकतींची अंतिम मुदत: १ ऑक्टोबर
  • अंतिम स्वीकृत अर्जांची यादी: ८ ऑक्टोबर
  • सोडतीचा अंतिम निकाल: १३ ऑक्टोबर

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कुठे घरं?

पुण्यात मांजरी खुर्द, म्हाळुंगे, भूगाव, धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, मुंढवा, बावधन आणि कोंढवा खुर्द यांसह विविध भागांमध्ये सदनिका उपलब्ध आहेत.

पिंपरी-चिंचवड परिसरात मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव या भागांमध्ये घरांचा समावेश आहे. ( Pune Development)

EWS आणि LIG गटासाठी उत्पन्नाची अट

EWS गटासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे, तर LIG गटासाठी वार्षिक उत्पन्न ९ लाख रुपयांपर्यंत असावे. उत्पन्नाचा पुरावा १ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीशी संबंधित असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात घर घेण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी ही म्हाडाची सोडत महत्त्वाची संधी ठरणार आहे. ( MHADA 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >