- दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
मुंबई : पार्थ पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादीत घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत पक्षाच्या 'कोअर कमिटी'ची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणावर सविस्तर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जनहिताचे चार निर्णय झाले. क्रीडा, उच्च व ...
नुकतीच पार्थ पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची झालेली भेट, दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून एकमेकांवर टीका टाळण्याचे धोरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या बैठका या सर्व घडामोडींमुळे राजकारणात नव्या 'रि-युनियन'ची चर्चा रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तळागाळातील कार्यकर्त्यांचीही पक्ष एकत्र यावा अशीच इच्छा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील ६,३६,०३६ पात्र शेतकऱ्यांना ₹५,०८६ कोटींच्या कर्जमुक्तीचा ...
पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) मधील ज्येष्ठ नेते आता दुसऱ्या गटातील सदस्यांसोबत संवाद साधण्यास तयार आहेत. यापूर्वी पक्षाचे काही पदाधिकारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर अनुकूल नव्हते, मात्र राजकारणात गमावलेली पकड पुन्हा मिळवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून नेतृत्वाने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर २९ ऑगस्ट रोजी होणारी ही कोअर कमिटीची बैठक अत्यंत निर्णायक ठरणार असून, या बैठकीकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Sharad Pawar)






