मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 'माझगावचा मोरिया' गणपतीच्या आगमन मिरवणुकीत हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. (Mumbai Police)
मिळालेल्या माहितीनुसार, गणपतीची मूर्ती घेऊन मिरवणूक पुढे जात असताना जवळच्या एका इमारतीवरून काही व्यक्तींनी जमावाच्या दिशेने दगडफेक केल्याचा आरोप आहे. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर अंडी फेकण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे मिरवणुकीत सहभागी नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण होते. (Egg Thrown)
View this post on Instagram
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संतप्त नागरिक आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये काही काळ शाब्दिक वाद झाल्याचेही समोर आले आहे. (Mazgaon Ganpati)
सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात
घटनेतील संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मिरवणूक मार्गावरील तसेच परिसरातील इमारतींमधील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. अंडी आणि दगडफेक नेमकी कोणी केली, याचा तपास सुरू असून, दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
View this post on Instagram
गणपती मंडळाचे उपसचिव विवेक राणे यांनी या प्रकाराचा निषेध करत जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मंडपापासून सुमारे 30 ते 40 मीटर अंतरावर असलेल्या इमारतीवरून मिरवणुकीच्या दिशेने अंडी फेकण्यात आली. (Ganapati Bappa)
दरम्यान, मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मिरवणूक मार्गांवर विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरातील परिस्थितीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. (Ganesh Mandal)






