Vaibhavwadi-Kolhapur Railway : कोल्हापूर ते कोकण अवघ्या १ तास ३६ मिनिटांत! ७० वळणे, ११ स्थानके; वैभववाडी रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण

रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी पुण्यातील बैठकीत दिली. त्यामुळे अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Vaibhavwadi-Kolhapur Railway)



१०७.६५ किमीचा प्रस्तावित रेल्वेमार्ग :


वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाची लांबी सुमारे १०७.६५ किलोमीटर असून, या प्रकल्पासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या कार्यकाळात सुरुवातीला ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापूर्वी ‘जे. पी. इंजिनिअरिंग’ कंपनीकडून या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला अपेक्षित वेग मिळाला नाही. (Vaibhavwadi-Kolhapur Railway)


आता मध्य रेल्वेकडून पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असल्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, नव्या सर्वेक्षणानंतर केंद्र सरकारकडून प्रकल्पाला प्रत्यक्ष मंजुरी कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vaibhavwadi-Kolhapur Railway)



७० वळणे आणि ११ स्थानके :


प्रस्तावित मार्गावर घाटमाथ्यावरील निसर्गरम्य परिसरातून रेल्वे धावणार आहे. या मार्गावर सुमारे ७० वळणे आणि ११ स्थानके प्रस्तावित असल्याचे सांगण्यात येते. रेल्वेचा वेग ताशी ११० किलोमीटर राहिल्यास कोल्हापूर ते कोकणचा प्रवास अवघ्या १ तास ३६ मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. (Vaibhavwadi-Kolhapur Railway)



रत्नागिरी आणि दक्षिण कोकणासाठी ठरणार वरदान :


हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील व्यापाराला मोठी चालना मिळू शकते. पश्चिम महाराष्ट्रातून दररोज मोठ्या प्रमाणात किराणा, दूध, अंडी आणि भाजीपाला कोकणात पाठवला जातो. रेल्वे मार्गामुळे या मालाची वाहतूक तुलनेने स्वस्त आणि जलद होण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील प्रसिद्ध हापूस आंबा, मासळी आणि अन्य कृषी व समुद्री उत्पादने पश्चिम महाराष्ट्रासह देशातील विविध बाजारपेठांमध्ये वेगाने पोहोचवता येतील. (Vaibhavwadi-Kolhapur Railway)



पर्यटनालाही मिळणार मोठी चालना :


वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गामुळे कोकणातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना गणपतीपुळे, भाट्ये, मालवण आणि तारकर्ली यांसारख्या पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. याचबरोबर कोकणातील नागरिकांसाठी कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूर आणि पंढरपूर यांसारख्या धार्मिक स्थळांना जाणे अधिक सुलभ होऊ शकते. (Vaibhavwadi-Kolhapur Railway)


पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील सागरी किनारपट्टीला थेट जोडणारा हा मार्ग व्यापार, उद्योग, पर्यटन आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. आता नव्या सर्वेक्षणानंतर या प्रकल्पाला प्रत्यक्ष मंजुरी आणि कामाला सुरुवात कधी होते, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागले आहे. (Vaibhavwadi-Kolhapur Railway)

Comments
Add Comment

Nashik Kumbhmela : १२ कोटी भाविकांच्या स्वागताची तयारी, सिंहस्थासाठी ३५ हजार कोटींची विकासकामे

Nashik Kumbhmela : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

Canada Gurdwara Attack : कॅनडातील गुरुद्वारात चाकू हल्ला; दोन जण जखमी, 27 वर्षीय तरुणाला अटक

कॅनडा : कॅनडातील एडमंटन येथील नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी पहाटे चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या