Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस. रोड क्रमांक 1 येथे रस्ता ओलांडणाऱ्या 15 वर्षीय मुलीला भरधाव बाईकस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Mumbai Accident)



रस्ता ओलांडताना बाईकने उडवलं


मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी रस्ता ओलांडत असताना अचानक भरधाव वेगाने आलेल्या बाईकने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मुलगी रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाली. मात्र, अपघातानंतर बाईकस्वाराने घटनास्थळी न थांबता तेथून पळ काढला.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


दरम्यान, पोलिसांकडून फरार बाईकस्वाराचा शोध सुरू आहे. अपघातस्थळ आणि परिसरातील दुकानं, इमारती तसेच चौकांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. बाईकचा वेग आणि अपघात नेमका कशामुळे झाला, याचाही तपास केला जात आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.

Comments
Add Comment

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात

BMC Coastal Committee : मुंबईतील किनारपट्टींच्या संवर्धनासाठी स्वतंत्र कोस्टल कमिटी, महापालिका सभागृहात ठराव मंजूर

चौपाट्यांच्या अस्वच्छतेवरून नगरसेवकांनी तीव्र नाराजी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या किनारप‌ट्टीचे

Mumbai News : मुंबईत पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

मुंबई : पाण्याच्या टाकीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीत घडली. गौतम