Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३ स्टोन क्रशर सील करण्यात आले आहेत. खंडाळा, वारूळवाडी, कापूरवाडी आणि आरणगाव परिसरातील या स्टोन क्रशरचा यामध्ये समावेश आहे. तहसीलदार मिलिंद कुलथे (Tehsildar Milind Kulthe) यांनी या कारवाईची माहिती दिली. कारवाईपूर्वी संबंधित स्टोन क्रशर चालकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व स्टोन क्रशर सील करण्यात आले. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे गौण खनिज माफीयांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Ahilyanagar Crime News)
स्टोन क्रशरच्या तक्रारींची दखल
दरम्यान, या केंद्रांची प्रदूषण नियंत्रण मंडळ (Pollution Control Board) आणि महावितरणकडून (Mahavitaran) स्वतंत्र तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याशिवाय संबंधित स्टोन क्रशरनी (Stone crusher) आतापर्यंत केलेल्या उत्खननाची मोजणी तसेच त्यासाठी भरलेल्या रकमेच्या चलनाचा ताळमेळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे तहसीलदार कुलथे यांनी स्पष्ट केले. स्टोन क्रशरबाबत (Stone crusher) प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, अशी माहितीही त्यांनी दिली. (Ahilyanagar Crime News)
Shravan Putrada Ekadashi : श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला ‘श्रावण पुत्रदा एकादशी’ किंवा ‘पवित्रा एकादशी’ असे म्हटले जाते. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष ...
आमदाराकडे नागरिकांचा तक्रारीचा पाढा
पंधरा दिवसांपूर्वी आमदार अर्जुन खोतकर (MLA Arjun Khotkar) यांच्या अध्यक्षतेखालील १६ आमदारांच्या विधिमंडळ अंदाज समितीने (Legislature Estimates Committee) नगर जिल्ह्यातील प्रकल्पांच्या कामाच्या तपासणीसाठी पाहणी केली होती. यावेळी कापूरवाडी आणि वारूळवाडी येथील स्टोन क्रशरची अचानक पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान नागरिकांनी समितीकडे बेकायदा गौण खनिज उत्खननाबाबत तक्रारी केल्या. कापूरवाडी येथे उत्खननामुळे एक संपूर्ण डोंगरच गायब झाल्याची तक्रारही समितीसमोर करण्यात आली होती. तसेच यापूर्वी अनेक स्टोन क्रशरवर दंडात्मक कारवाई होऊनही दंडाची वसुली झालेली नसल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. (Ahilyanagar Crime News)
६३ स्टोन क्रशरवर सीलची कारवाई
या सर्व तक्रारींची दखल घेत समितीने जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (District Collector Dr. Pankaj Ashiya) यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पूर्वीच्या कारवाईतील दिरंगाईचा आढावा घेतला. त्यानंतर ६३ स्टोन क्रशरवर (Stone crusher) सीलची कारवाई करण्यात आली असून, शुक्रवारी अखेरच्या स्टोन क्रेशरला सील करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.