Pharma Factory Blast : फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू, 6 जखमी

यादद्री : तेलंगणातील यादद्री भोंगीर जिल्ह्यात फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूदान पोचमपल्ली मंडलातील डोंथिगुडम येथील हझेलो फार्मा कंपनीत शुक्रवारी रात्री उशिरा हा स्फोट झाला. या दुर्घटनेत सहा कामगार जखमी झाले आहेत. ( Pharma Factory Blast)


मिळालेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख राजशेखर आणि नागराजू अशी झाली आहे. दोघांचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींना पुढील उपचारांसाठी हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.



स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आल्यानंतर तसेच कंपनीच्या परिसरातून आगीच्या मोठ्या ज्वाला दिसल्यानंतर स्थानिकांनी तातडीने प्रशासनाला माहिती दिली. कंपनीच्या अग्निशमन दलाने सुरुवातीला आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. ( Pharma Unit Explosion)


विशेष म्हणजे, याच कंपनीत यापूर्वीही दुर्घटना घडली होती. 16 जुलै रोजी रिॲक्टरमधून विषारी वायू बाहेर पडल्याने आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील कर्मचारी कृष्णा रेड्डी यांचा मृत्यू झाला होता.


अवघ्या काही आठवड्यांच्या अंतराने याच युनिटमध्ये पुन्हा दुर्घटना घडल्याने स्थानिकांमध्ये चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. कंपनीत सुरक्षा नियमांचे योग्य पालन केले जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, प्रशासनाने कंपनीची सखोल तपासणी करून सुरक्षा उपायांमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ( Telangana Pharma Company)

Comments
Add Comment

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि

Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा

गुवाहाटी : आसाममध्ये पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४ हजार ७९९ नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. नद्यांची

Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचा PR कॅमेऱ्यावर उघडा पडला’; पुण्याच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपये वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे : पुण्यात २२ ऑगस्ट रोजी आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून मोठा राजकीय वाद

Amit Shah : शेतकरी, तरुण अन् महिलांसाठी मोठ्या घोषणा! सिलीगुडीत तीन नव्या फौजदारी कायद्यांच्या प्रदर्शनाला गृहमंत्री अमित शाहंची भेट

सिलीगुडी : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पश्चिम बंगालमधील (West Bengal) सिलीगुडी (Siligudi) येथे 'तीन नवीन फौजदारी

Alaska Plane Crash : अँकरेजवरून उडालेले सेसना चार्टर विमान दुर्गम भागात कोसळले; २ वैमानिकांसह ८ प्रवासींचा मृत्यू

अमेरिकेतील अलास्का प्रांतातील अत्यंत कठीण आणि बर्फाच्छादित परिसरात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेड