Sugar Price Hike : साखर उत्पादनात मोठी घट; दरवाढीने ग्राहकांना फटका, सरकारने सांगितली ‘ही’ कारणे

नवी दिल्ली : चालू साखर हंगामात देशातील साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीतील २०२५-२६ हंगामात सुमारे ३०६ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. सुरुवातीला राज्यांनी व्यक्त केलेल्या ३४३ लाख टनांच्या अंदाजापेक्षा हे उत्पादन तब्बल ११ टक्क्यांनी कमी आहे. (Sugar Price Hike)


साखरेच्या उत्पादनातील घट आणि वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती वाढल्या आहेत. शुक्रवारी किरकोळ साखरेचा दर ५८.२ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. महिनाभराच्या तुलनेत हा दर सुमारे २० टक्क्यांनी, तर गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास २६ टक्क्यांनी वाढला आहे. (Sugar Price Hike)



साखरेचा साठाही घटणार :


उत्पादन कमी झाल्यामुळे १ ऑक्टोबर रोजी उपलब्ध असणारा साखरेचा सुरुवातीचा साठा सुमारे ३३ ते ३४ लाख टनांवर येण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी याच वेळी हा साठा सुमारे ५० लाख टन होता. मात्र, उपलब्ध साठा पुरेसा असल्याने नव्या गाळप हंगामातील साखर बाजारात येईपर्यंत देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यात कोणतीही मोठी अडचण येणार नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. (Sugar Price Hike)



इथेनॉलसाठी साखर वळवल्याचा आरोप सरकारने फेटाळला :


साखरेच्या दरवाढीसाठी इथेनॉल उत्पादनाकडे साखर वळवल्याचा आरोप केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, इथेनॉलसाठी वळवण्यात येणाऱ्या साखरेचे प्रमाण गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी झाले आहे. २०२२-२३ मध्ये सुमारे १२ टक्के साखर इथेनॉलसाठी वळवली जात होती, तर २०२५-२६ मध्ये हे प्रमाण सुमारे ९ टक्क्यांवर आले आहे. याशिवाय, भारतात तयार होणाऱ्या इथेनॉलपैकी जवळपास तीन-चतुर्थांश इथेनॉल आता धान्यापासून तयार होत असल्याचे सरकारने सांगितले. (Sugar Price Hike)



साखरेच्या दरवाढीमागे अनेक कारणे :


अन्न मंत्रालयाच्या मते, साखरेच्या दरवाढीमागे केवळ उत्पादनातील घट कारणीभूत नाही. सणासुदीच्या काळात वाढलेली मागणी, हवामानामुळे उसाच्या पिकाचे झालेले नुकसान, जागतिक पातळीवरील घटता साखर पुरवठा तसेच काही ठिकाणी साठेबाजी आणि बाजारातील अंदाज यामुळेही दर वाढले आहेत. महाराष्ट्रात गेल्या ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा तसेच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील उसावर रेड रॉट आणि टॉप बोरर रोगांचा उत्पादनावर परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Sugar Price Hike)



साखर आयातीला परवानगी :


देशातील पुरवठ्याबाबत निर्माण झालेली चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने नुकतीच १० लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. जागतिक स्तरावरही साखरेचा पुरवठा घटत असल्याचे सरकारने म्हटले आहे. २०२६-२७ मध्ये जागतिक साखर तूट सुमारे ३३ लाख टन राहण्याचा अंदाज असून, हवामानाशी संबंधित चिंतेमुळे जागतिक बाजारातील परिस्थिती आणखी कठीण होण्याची शक्यता आहे. (Sugar Price Hike)

Comments
Add Comment

Vaibhavwadi-Kolhapur Railway : कोल्हापूर ते कोकण अवघ्या १ तास ३६ मिनिटांत! ७० वळणे, ११ स्थानके; वैभववाडी रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण

रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाबाबत

Mitchell Starc : मिचेल स्टार्कचा बांगलादेशवर कहर; अवघ्या २२ चेंडूत अर्धी टीम गारद, डेल स्टेनलाही टाकलं मागे

Aus vs Ban 2nd Test Match : ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना मॅके येथे खेळवला जात आहे. पहिल्या

Pharma Factory Blast : फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोट; 2 कामगारांचा मृत्यू, 6 जखमी

यादद्री : तेलंगणातील यादद्री भोंगीर जिल्ह्यात फार्मा कंपनीत रिॲक्टरचा स्फोट होऊन दोन कामगारांचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक