Jyoti Waghmare : पहिल्याच अधिवेशनानंतर खासदार ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारकडून महिला व बालविकास मंत्रालय समितीवर निवड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वीकारले पत्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने शिवसेना खासदार डॉ. ज्योती नागनाथ वाघमारे यांची महिला व बालविकास मंत्रालयाच्या अत्यंत महत्त्वाच्या सल्लागार समितीवर (Consultative Committee) सदस्य म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. पहिल्याच संसदीय अधिवेशनानंतर डॉ. वाघमारे यांना मिळालेली ही मोठी जबाबदारी त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे. भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १७ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे या नियुक्तीची घोषणा केली.



मुख्य नेत्यांच्या हस्ते पत्राचा स्वीकार


या महत्त्वपूर्ण निवडीचे अधिकृत पत्र शिवसेना मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते स्वीकारण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. ज्योती वाघमारे यांचे विशेष कौतुक केले आणि महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर उत्तम कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला.



पहिलेच अधिवेशन आणि मोठी जबाबदारी


राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दाखवली होती. याचीच दखल घेत मोदी सरकारने त्यांची महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. देशातील महिलांचे आरोग्य, सुरक्षा आणि बालकांचा विकास या विषयांवर ही समिती धोरणात्मक सल्ला देण्याचे काम करते.


या नियुक्तीबद्दल डॉ. ज्योती वाघमारे यांच्यावर राजकीय आणि सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

BWF World Championships : त्रिसा-गायत्रीची ऐतिहासिक कामगिरी; 15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत विश्वविजेतेपदाचे पदक निश्चित

नवी दिल्लो : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत

Nashik Crime : तिने मला प्रेमात फसवले...; चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

Nashik Crime : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात २६ वर्षीय वरुण भामरे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची

Jalgaon : भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण तिहेरी अपघात, एकाचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ-मुक्ताईनगर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लालमाती परिसरातील पहिलवान ढाब्याजवळ

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचा PR कॅमेऱ्यावर उघडा पडला’; पुण्याच्या कार्यक्रमासाठी इन्फ्लुएन्सर्सना २५,००० रुपये वाटल्याचा भाजपचा आरोप

पुणे : पुण्यात २२ ऑगस्ट रोजी आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून मोठा राजकीय वाद

Ahilyanagar Crime : घरासमोर लावली गांजाची झाडे, 64.73 किलो वजनाचा गांजा जप्त

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील धनगरवाडी (Dhangarwadi) येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धनगरवाडी येथे चक्क घरासमोर