Mumbai Powai News : दृष्ट काढण्याच्या बहाण्याने घरात शिरला अन्...; पवईत तृतीयपंथीयाचे सोंग घेऊन महिलेवर अत्याचार!

मुंबई : मध्य मुंबईतील पवई परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. घरातील वाईट नजर आणि दृष्ट काढण्याच्या बहाण्याने तृतीयपंथीयाचे रूप धारण करून एका घरात शिरलेल्या नराधमाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या काही तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या आहेत.



दृष्ट काढण्याच्या बहाण्याने बेडरूममध्ये प्रवेश


मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑगस्ट रोजी अनिल शेषराव शिंदे (वय २८) नावाच्या या आरोपीने साडी नेसून तृतीयपंथी असल्याचे भासवले. घरातील वाईट नजर काढतो असे सांगून तो पीडित महिलेच्या घरात शिरला. घरात प्रवेश मिळताच त्याने थेट बेडरूम गाठली आणि महिलेला जीवे मारण्याची तसंच शारीरिक इजा करण्याची धमकी दिली. या भीतीच्या साहाय्याने त्याने महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने तात्काळ पवई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.



सीसीटीव्हीच्या आधारे ठाण्यातून आरोपीला ठोकल्या बेड्या


घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता, साडी नेसलेला एक संशयित व्यक्ती रिक्षाने ठाण्यातील खारेगाव झोपडपट्टीच्या दिशेने पसार झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मागोवा घेत खारेगावमधून अनिल शिंदे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान समोर आले की, आरोपी केवळ तृतीयापंथीयाचेच नव्हे, तर भिकाऱ्याचे सोंग घेऊनही लोकांची दिशाभूल करायचा.



पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन


या धक्कादायक घटनेनंतर पोलीस प्रशासनाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी व्यक्ती, भिकारी किंवा दृष्ट काढण्याच्या बहाण्याने येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला थेट घरात प्रवेश देऊ नका, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. परिसरात अशी कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Anna Bansode : वांद्रेतील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी; ७ दिवसांत बैठक घेण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

मुंबई : वांद्रे (पूर्व) येथील टीचर्स कॉलनी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील एमएसआरडीसीच्या फुट ओव्हर ब्रिजवरील

Ashish Shelar : आदित्य ठाकरेंचा 'दिमागी' नक्षलींशी संवाद वाढलाय?

- मंत्री आशिष शेलार यांचा घणाघात; गणेशोत्सवातील परंपरांवर आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न मुंबई :

Mumbai Metro : गणेशोत्सवात मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार

- मंत्री मंगल प्रभात लोढा; रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचे निर्देश मुंबई : गणेशोत्सवाच्या

Police Department : लोकसंख्या आणि गुन्हेगारीनुसार होणार पोलीस ठाण्यांची नव्याने रचना

- गृह विभागाकडून ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी; मुंबईसाठी ३६२ मनुष्यबळाची मर्यादा, सायबर ठाण्यांसाठी स्वतंत्र

Maha Walkathon : महा वॉकेथॉनमधून जलसंपन्न महाराष्ट्राचा संदेश; राज्यभरात 3 लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग

मुंबई : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक (Sudhakarrao Naik) यांच्या जलसंधारणाच्या कार्याची आठवण ठेवत 21 ऑगस्ट हा दिवस

Shweta Tiwari on Raj Thackeray : "मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का?" श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना थेट परखड सवाल

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिला सोशल मीडियावर अत्यंत अपमानास्पद कमेंट्स आणि अश्लील