Nashik Crime : तिने मला प्रेमात फसवले...; चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

Nashik Crime : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात २६ वर्षीय वरुण भामरे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. वरुण भाऊसाहेब भामरे (२६, रा. गोकुळधाम, ध्रुवनगर, गंगापूर) याने गुरुवारी (दि.२०) सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने प्रेयसीसह तिघांवर गंभीर आरोप केले आहेत. वरुणने चिठ्ठीत प्रेमात फसवणूक झाल्याचा आणि आपल्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच पैसे परत मागितल्यानंतर धमकावण्यात आल्याचेही त्याने नमूद केले आहे.(Nashik Crime News)



रस्त्यात अडवून धमकी आणि  मारहाण 


एवढेच नाही, तर घटनेच्या आदल्या दिवशी आपल्याला रस्त्यात अडवून मारहाण करण्यात आली आणि धमकी देण्यात आल्याचा दावाही वरुणने चिठ्ठीत केला आहे. आपल्या मृत्यूसाठी संबंधित तिघे आणि प्रेयसीचे भाऊ जबाबदार असल्याचा उल्लेख त्याने चिठ्ठीत केला आहे. तसेच नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे न्यायाची मागणी करत संबंधितांना शिक्षा करण्याची विनंती केली आहे. माहितीनुसार गंगापुररोडवरील ध्रुवनगरमध्ये राहणाऱ्या वरुणचे एका युवतीवर प्रेम होते. मात्र प्रेमात फसवणूक आणि धमकीमुळे त्याने आयुष्य संपवले आहे. (Nashik Crime News)



गंगापुर पोलिसांकडून तपास सुरु


दरम्यान, वरूणला बेशुद्धावस्थेत त्याचा मावसभाऊ तेजस पवार याने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून वरुणला मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) अकस्मात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी वरुणने मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गंगापुर पोलिस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.



शेवटच्या चिठ्ठीत वरून काय म्हणाला ?


कमिश्नर संदीप कर्णिक सर माझ्या मरण्यामागे हे हे तिघे आणि तिचे भाऊ आहे. काल त्यांनी मला रस्त्यात अडवून मारलं आणि धमकी दिली, की तू मर नाही तर...' त्यांना माझे घेतलेले कॅश द्यायचे नाही वन टाइम, त्यामुळे माझ्यावर काहीही आरोप लावला आहे. तिने मला प्रेमात फसवले व माझ्याकडून हवे तेवढे कॅश काढून घेतले. मी माझे कॅश वन टाइम मागितले तर तुझी वाट लावू अशी धमकी देतात. संदीप कर्णिक सर माझी तुम्हाला विनंती आहे, मोठे माणसे पैशांच्या जीवावर काहीही करु शकता, पण मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. प्रतिक्षा करावी लागली तरी चालेल पण यांना शिक्षा करा, असंही वरूणने म्हटलं आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या

Smriti Irani : दिखाऊपणा करणाऱ्या राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते म्हणून शिक्षण सुधारणांसाठी एक तरी सूचना केली आहे का ? स्मृती इराणींचा सवाल

नवी दिल्ली : दिखाऊपणा करणाऱ्या राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विरोधी पक्षनेते म्हणून शिक्षण सुधारणांसाठी एक तरी सूचना

Hockey World Cup : उपांत्य फेरीच्या मार्गात भारतासमोर नेदरलँड्सचे कडवे आव्हान

अम्स्टेलवीन : एफआयएच हॉकी विश्वचषक बेल्जियम-नेदरलँड्स 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय पुरुष आणि महिला संघांसमोर

CM Devendra Fadnavis : ‘सीएसआर’ निधीच्या वापरासाठी राज्यात स्थापन होणार ‘महा सीएसआर प्राधिकरण’

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणार मुंबई : महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक

Mihir Kotecha : मुलुंडमधील १०० हून अधिक बेकायदा चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करा; आमदार मिहिर कोटेचा यांची मागणी

उच्च न्यायालयाचे आदेश आणि 'झिरो टॉलरन्स' धोरण असूनही बीएमसीच्या टी वॉर्डने तक्रारींकडे दुर्लक्ष केले; महापालिका

Rahul Gandhi : राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमासाठी 'जेन-झी' इन्फ्लुएंसर्सना २५ हजारांची ऑफर?

- भाजपकडून व्हिडिओ पुरावा सादर; काँग्रेसचा 'फर्जीवाडा' उघड झाल्याचा दावा मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल