Thursday, August 20, 2026

Weekend Vibes : या विकेंडला बाहेर जायचा कंटाळा आलाय ? काहीतरी वेगळं करायचं आहे ? मग या गोष्टी नक्की ट्राय करून बघा

Weekend Vibes : या विकेंडला बाहेर जायचा कंटाळा आलाय ? काहीतरी वेगळं करायचं आहे ? मग या गोष्टी नक्की ट्राय करून बघा

मुंबई : आठवडाभर कामाच्या धावपळीनंतर वीकेंडला आराम करावासा वाटतो. पण दरवेळी बाहेर फिरणे, मॉलमध्ये जाणे किंवा कॅफेमध्ये बसणे हा पर्याय प्रत्येकाला आवडेलच असे नाही. अशावेळी घरात राहूनही वीकेंड मजेदार आणि क्रिएटिव्ह बनवता येतो. सोशल मीडिया स्क्रोल करण्याऐवजी नवीन छंद किंवा एखादी छोटीशी अॅक्टिव्हिटी करून पाहिल्यास वेळही छान जाईल. (Weekend Vibes)

पेंटिंग किंवा DIY करा : चित्रकला, स्केचिंग, क्राफ्ट किंवा घरातील जुन्या वस्तूंपासून काहीतरी नवीन तयार करण्याचा प्रयत्न करा. DIY अॅक्टिव्हिटीसाठी फार मोठी तयारी किंवा खर्चाची गरज नसते.

आवडतं पुस्तक वाचा : मोबाईल बाजूला ठेवून एखादं आवडतं पुस्तक वाचण्यासाठी वेळ द्या. कादंबरी, आत्मचरित्र किंवा तुमच्या आवडीच्या विषयावरील पुस्तक निवडू शकता.

काहीतरी नवीन बनवून पाहा : वीकेंडला स्वयंपाकघरात प्रयोग करा. एखादी नवीन डिश, केक किंवा तुमच्या आवडीचा पदार्थ स्वतः बनवून पाहा. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत मिळून स्वयंपाक केल्यास हा अनुभव आणखी मजेदार होऊ शकतो. (Weekend Vibes)

घरात छोटं गार्डन तयार करा : बाल्कनी किंवा खिडकीजवळ काही कुंड्या ठेवून छोटंसं गार्डन तयार करा. झाडांची निगा राखणे हा शांत आणि आनंददायी छंद ठरू शकतो.

Journaling करून पाहा : गेल्या आठवड्यात काय घडलं, पुढच्या आठवड्यात काय करायचं आहे किंवा मनातले विचार लिहून काढा. स्वतःसाठी थोडा वेळ देण्याचा हा सोपा मार्ग आहे.

घरच्या घरी Movie Marathon : तुमच्या आवडत्या चित्रपटांची किंवा वेबसीरिजची यादी तयार करा. पॉपकॉर्न, चहा आणि आरामदायी वातावरणात घरच्या घरी छोटासा थिएटर अनुभव घ्या. (Weekend Vibes)

स्वतःसाठी ‘Me Time’ : योग, मेडिटेशन, स्किनकेअर, आवडतं संगीत ऐकणे किंवा फक्त शांतपणे आराम करणे. वीकेंडला स्वतःला रिचार्ज करण्यासाठी वेळ द्या. सध्या ‘slow weekend’ आणि अशा शांत, क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटीजकडेही कल वाढताना दिसतो. (Weekend Vibes)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >