Thursday, August 20, 2026

Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding : तब्बल १० वर्षांनंतर पूर्ण झाली इच्छा; स्कॉटिश खासदार मार्टिन डे यांनी केरळच्या नितिन चंद यांच्यासोबत मंदिरात केले पारंपरिक लग्न

Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding : तब्बल १० वर्षांनंतर पूर्ण झाली इच्छा; स्कॉटिश खासदार मार्टिन डे यांनी केरळच्या नितिन चंद यांच्यासोबत मंदिरात केले पारंपरिक लग्न

केरळ : स्कॉटलंडच्या संसद सदस्य (MSP) मार्टिन डे आणि केरळच्या नितिन चंद यांनी प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात पारंपरिक हिंदू पद्धतीने विवाहसोहळा पार पाडला. तब्बल दहा वर्षांपासून अपूर्ण असलेली नितिन यांची गुरुवायूर मंदिरात विवाहाच्या धार्मिक विधी करण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली. (Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding)

नितिन चंद या एर्नाकुलम जिल्ह्यातील पिरवोमच्या रहिवासी असून २००८ मध्ये उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला गेल्या होत्या. याच काळात त्यांची मार्टिन डे यांच्याशी ओळख झाली. दोघांनी २०१६ मध्ये ब्रिटनमध्ये विवाह केला होता. मात्र, गुरुवायूर मंदिरात पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याचे त्यांचे स्वप्न केरळमधील पूर आणि त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक वर्षे पुढे ढकलले गेले. (Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding)

गुरुवायूर मंदिरात पारंपरिक विवाहसोहळा :

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, स्कॉटिश नॅशनल पार्टीचे वरिष्ठ नेते मार्टिन डे यांनी गुरुवायूर मंदिरात धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. मंदिरातील विधींनंतर मंगळवारी गुरुवायूरमधील एका सभागृहात पारंपरिक विवाहसोहळाही आयोजित करण्यात आला. यावेळी कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मार्टिन डे यांनी गुरुवायूरमधील विवाहसोहळ्याचे फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर शेअर केले. या फोटोंमध्ये दोघेही पारंपरिक भारतीय पोशाखात दिसत आहेत. (Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding)

२००८ मध्ये भेट, २०१६ मध्ये लग्न :

नितिन चंद २००८ मध्ये आयटी मॅनेजमेंटमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी ब्रिटनमध्ये गेल्या होत्या. यादरम्यान त्यांची मार्टिन डे यांच्याशी भेट झाली. कालांतराने दोघांचे नाते अधिक दृढ झाले आणि २०१६ मध्ये त्यांनी ब्रिटनमध्ये विवाह केला. नितिन यांची गुरुवायूर मंदिरात पारंपरिक पद्धतीने विवाह करण्याची इच्छा मात्र अनेक वर्षे अपूर्ण राहिली. केरळमधील पूर आणि कोविड-19 महामारीमुळे मंदिरातील धार्मिक विधी लांबणीवर पडले. अखेर यंदा दोघांनी गुरुवायूरला पोहोचून ही इच्छा पूर्ण केली. (Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding)

मार्टिन डे कोण आहेत?

५५ वर्षीय मार्टिन डे हे स्कॉटिश नॅशनल पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी १९९९ मध्ये वेस्ट लोथियन कौन्सिलचे सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१५ मध्ये ते लिनलिथगो आणि ईस्ट फॉल्कर्क मतदारसंघातून ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सवर खासदार म्हणून निवडून आले होते.

२०२४ पर्यंत त्यांनी ब्रिटिश संसदेत खासदार म्हणून काम केले. २०२६ च्या स्कॉटिश संसद निवडणुकीत त्यांनी पुन्हा राजकीय मैदानात प्रवेश केला आणि फॉल्कर्क ईस्ट व लिनलिथगो मतदारसंघातून MSP म्हणून निवडून आले. सध्या ते स्कॉटिश संसदेच्या क्लायमेट अॅक्शन कमिटी तसेच इकॉनॉमी, टुरिझम अँड एनर्जी कमिटीचे सदस्य आहेत. (Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding)

नितिन चंद यांचीही प्रेरणादायी कहाणी :

नितिन चंद यांनी ब्रिटनमध्ये आयटी मॅनेजमेंटमध्ये मास्टर डिग्री घेतली. पीएचडीदरम्यान ब्रिटनमध्ये नवीन इमिग्रेशन नियम लागू झाल्यानंतर अनेक परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले. नितिन यांचाही व्हिसा रद्द झाला होता. मात्र, त्यांनी ब्रिटन सोडण्याऐवजी या प्रश्नावर सक्रिय भूमिका घेतली. त्यांनी संसदेत आपली बाजू मांडली तसेच विविध समित्यांसमोर भारतीय विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व केले. याच काळात त्यांची तत्कालीन खासदार मार्टिन डे यांच्याशी भेट झाली. (Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding)

दोघांनी २०१६ मध्ये विवाह केला. नितिन यांनी आपण घटस्फोटित असून आपल्याला १२ वर्षांचा मुलगा असल्याचे मार्टिन यांना सांगितले होते. त्यानंतर मार्टिन यांनी नितिन आणि त्यांच्या मुलाचा स्वीकार केला. मार्टिन यांनी नितिन यांची त्यांच्या पालकांशीही भेट घडवून आणली आणि कुटुंबाने त्यांचे प्रेमाने स्वागत केले. आता तब्बल दहा वर्षांनंतर गुरुवायूर मंदिरात पारंपरिक विवाहसोहळा पार पडल्याने नितिन आणि मार्टिन यांच्या कुटुंबासाठी हा क्षण विशेष ठरला आहे. (Martin Day Nithin Chand Guruvayur Wedding)

 
View this post on Instagram
 

A post shared by jith (@jith__uday)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >