Sunetra Pawar News : सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीवर आक्षेप कायम

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सच्चिदानंद सिंह यांच्याकडून स्मरण नोटीस


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून पक्षात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा एकदा स्मरण नोटीस (रिमायंडर नोटीस) पाठवली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात पाठवलेल्या नोटीशीनंतर आता १७ ऑगस्ट रोजी ही दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे. ( Sunetra Pawar News)



राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर २६ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. मात्र, या निवडीवर पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी आक्षेप घेतला आहे. ही निवडणूक प्रक्रिया पक्षाच्या घटनेला आणि नियमांना धरून नसून ती घटनाबाह्य असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Nationalist Congress Party)


सच्चिदानंद सिंह यांनी आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, या निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी कोणतेही कायदेशीर निवडणूक प्राधिकरण अस्तित्वात नव्हते. तसेच पक्षाच्या राष्ट्रीय प्रतिनिधींना नामांकन दाखल करणे, निवडणूक लढवणे किंवा मतदान करण्यापासून वंचित ठेवून परस्पर निवड करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी ९ जुलै रोजी पाठवलेल्या पत्राला पक्षाच्या कोणाकडूनही उत्तर न मिळाल्यामुळे, आता त्यांनी कायदेशीर पावलाचा भाग म्हणून ही स्मरण नोटीस बजावली आहे. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आगामी काळात यावर पक्षातील वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Sachidanand Singh)

Comments
Add Comment

Cricket Match-Fixing : कॅनडावरील मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाईंचा राजीनामा

नवी दिल्ली : कॅनडाच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मॉन्टी देसाई यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १

Maharashtra Politics : ‘संजय राऊतांना कितीही मिरच्या झोंबल्या तरी जगभरातून महाराष्ट्राचे कौतुक होणार’; भाजपचा टोला

मुंबई:  अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केल्यावरून भाजपने

CM Devendra Fadnavis : कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या दत्तक मुलीचा मुख्यमंत्र्यांनी लावून दिला पुनर्विवाह

मुंबई : कोरोना काळात संकटात सापडलेल्या आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह

10 Oldest Countries : जगातील १० सर्वात प्राचीन देश कोणते? इतिहासात याचं एकच उत्तर नाही!

जगातील सर्वात जुना देश कोणता? हा प्रश्न सोपा वाटतो… पण इतिहास त्याचं उत्तर तितकं सोपं देत नाही. कारण “देश किती

sajjan kumar passes away : १९८४ च्या शिखविरोधी दंगलीतील दोषी माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचा वयाच्या ८० व्या वर्षी तिहार जेलमध्ये मृत्यू

नवी दिल्ली : १९८४ च्या भीषण शिखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन

Pune School Van Fire : काळ आला होता पण...! पिंपरीत चालू स्कूल व्हॅनने अचानक घेतला पेट, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

पुणे :  पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी स्कूल व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप