नवी दिल्ली : स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची योजना राबवली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजना-शहरी २.० (PMAY-U 2.0) अंतर्गत पात्र शहरी कुटुंबांना परवडणारी घरं मिळवून देण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. विशेष म्हणजे, या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपुरता मर्यादित नसून पात्र मध्यमवर्गीय कुटुंबांनाही मिळू शकतो. या योजनेअंतर्गत ₹२५ लाखांपर्यंतच्या होमलोनवर व्याज सवलतीचा लाभ मिळू शकतो. मात्र, यासाठी सरकारने काही अटी निश्चित केल्या आहेत. (PM Awas Yojana 2.0)
कोणाला मिळू शकतो योजनेचा लाभ?
PMAY-U 2.0 चा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाकडे देशात कुठेही स्वतःचं पक्कं घर नसणं आवश्यक आहे. तसेच, कुटुंबाने यापूर्वी कोणत्याही सरकारी गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा. (PM Awas Yojana 2.0) योजनेत कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार विविध गट करण्यात आले आहेत.
पहिला गट - EWS: वार्षिक उत्पन्न ₹३ लाखांपर्यंत
दुसरा गट - LIG: वार्षिक उत्पन्न ₹३ लाख ते ₹६ लाख
तिसरा गट - MIG: वार्षिक उत्पन्न ₹६ लाख ते ₹९ लाख
म्हणजेच, वार्षिक उत्पन्न ₹९ लाखांपर्यंत असलेल्या पात्र कुटुंबांना योजनेच्या संबंधित घटकाचा लाभ मिळू शकतो. (PM Awas Yojana 2.0)
मुंबई : भारतातील उद्योग जगतातील सर्वात मोठी उद्योग समूह असलेला टाटा सन्सबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. टाटा सन्सच्या १०० वर्षांहून अधिक काळाच्या ...
योजनेचे चार प्रमुख घटक :
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी २.० अंतर्गत चार प्रमुख घटक आहेत.
१. Beneficiary Led Construction (BLC) – लाभार्थी आधारित घरबांधणी
२. Affordable Housing in Partnership (AHP) – भागीदारीतून परवडणारी घरबांधणी
३. Affordable Rental Housing (ARH) – परवडणारी भाडेतत्त्वावरील घरं
४. Interest Subsidy Scheme (ISS) – गृहकर्जावरील व्याज सवलत
लाभार्थ्याच्या पात्रतेनुसार संबंधित घटकाचा लाभ घेता येतो. (PM Awas Yojana 2.0)
₹२५ लाखांच्या होमलोनवर व्याज सवलत :
व्याज सवलत योजनेअंतर्गत EWS, LIG आणि MIG गटातील पात्र कुटुंबांना गृहकर्जावर सवलत मिळू शकते. ₹३५ लाखांपर्यंत किंमत असलेल्या घरासाठी ₹२५ लाखांपर्यंतच्या गृहकर्जावर ही योजना लागू होऊ शकते. सरकारी माहितीनुसार, पात्र लाभार्थ्यांना पहिल्या ₹८ लाखांच्या कर्जावर 4 टक्के व्याज सवलत मिळू शकते. ही सवलत १२ वर्षांच्या कर्ज कालावधीसाठी लागू असलेल्या नियमानुसार दिली जाते. पात्र लाभार्थ्यांना कमाल ₹१.८० लाखांपर्यंत केंद्रीय व्याज अनुदान मिळू शकते. हे अनुदान पाच वार्षिक हप्त्यांमध्ये दिले जाते. (PM Awas Yojana 2.0)
मुंबई : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची महत्त्वाची बातमी आहे. मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही ...
१ कोटींहून अधिक घरं पूर्ण :
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी आणि PMAY-U 2.0 अंतर्गत आतापर्यंत १.२५ कोटींहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी १ कोटींहून अधिक घरं पूर्ण झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.शहरी भागातील पात्र कुटुंबांना परवडणारी घरं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने PMAY-U 2.0 ची अंमलबजावणी वेगाने करण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. मात्र, योजनेचा लाभ घेण्यापूर्वी आपली पात्रता, उत्पन्नाची मर्यादा, घराची किंमत, गृहकर्जाची रक्कम आणि संबंधित सरकारी नियम तपासणे महत्त्वाचे आहे. (PM Awas Yojana 2.0)