पुणे : जुन्नर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे. प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, तो पीडित मुलीच्या परिचयातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने मुलीची दिशाभूल करून तिच्यावर अत्याचार केल्याचे तपासातून समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. (Junnar Crime)
या प्रकरणाचा तपास उपलब्ध पुरावे, साक्षी आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पूर्ण करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळण्यासाठी पोलिसांनी प्रभावीपणे पाठपुरावा करावा, अशी मागणी शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची माहिती घेतली. तपास योग्य दिशेने सुरू असून आरोपीला अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Sexual Assault case)
Nashik Crime : नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये होणारी वाढ आता चिंतेचा विषय ठरत आहे. मोबाईलमध्ये शूटिंग केल्याच्या जुन्या वादातून एका तरुणावर ...
नसरापूर येथील घटनेचा संदर्भ देताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, त्या प्रकरणात पोलिसांनी आणि शासनाने सातत्याने पाठपुरावा केला होता. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत पुरावे आणि साक्षी योग्य पद्धतीने मांडण्यात आल्या. त्याचप्रमाणे जुन्नर प्रकरणातही दोषी व्यक्तीला कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (Pune Crime)
महिला आणि बालिकांच्या सुरक्षेसाठी केवळ मुलींमध्ये जनजागृती करून उपयोग होणार नाही. युवकांमध्ये लैंगिक संवेदनशीलता, जबाबदार वर्तन आणि महिलांचा सन्मान याबाबत सातत्याने जनजागृती करणे आवश्यक आहे, असे डॉ. गोऱ्हे ( Dr. Neelam Gorhe) यांनी सांगितले. समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेल्या अश्लील आणि हिंसक आशयाचा तरुणांच्या मानसिकतेवर होणारा परिणामही गांभीर्याने तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी गावपातळीवर समुपदेशन, जनजागृती, तक्रार निवारण आणि तातडीने हस्तक्षेप करणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करून व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. ( minor girl)