Ladki Bahin Yojana : अपात्र शासकीय कर्मचाऱ्यांकडून लाडक्या बहिणींच्या निधी वसुलीबाबत अनास्था?

- माहिती अधिकारातून समोर; ९२ लाख लाभार्थी वगळल्याने वार्षिक खर्च २९ हजार ८१९ कोटींवर


मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी पडताळणीनंतर तब्बल ९२ लाख १० हजार अपात्र महिलांची नावे वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, यात साडेचार लाखांहून अधिक शासकीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश असून, त्यांच्याकडून निधी वसूल करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर कमालीची अनास्था दिसून येत असल्याचे अधिकारातून (आरटीआय) समोर आले आहे. (Ladki Bahin Scheme)


आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी दाखल केलेल्या अर्जातून ही आकडेवारी समोर आली आहे. पडताळणी मोहिमेपूर्वी या योजनेच्या सक्रिय लाभार्थींची संख्या २.४८ कोटींच्या घरात होती, आता ती १.६५ कोटींवर स्थिरावली आहे. या कपातीमुळे योजनेचा वार्षिक आर्थिक भार २९ हजार ८१९ कोटी १० लाख रुपयांवर आला आहे. (Ladki Bahin Scheme)


दुसरीकडे, सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटलेला निधी हा अंदाजे ६०० ते ८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. विधिमंडळात आणि मंत्र्यांच्या स्तरावर या निधीची वसुली करण्याचे वारंवार आश्वासन दिले गेले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही जिल्हा कार्यालयाकडून या वसुलीबाबतचा अहवाल किंवा माहिती प्राप्त झालेली नाही. म्हणजेच, कागदावर आदेश असूनही प्रत्यक्ष वसुलीची यंत्रणा अद्याप ठप्पच असल्याचे या माहितीवरून स्पष्ट होते.


पडताळणी दरम्यान ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे ६२ लाख, कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याने १६ लाख, तर शासकीय कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सुमारे ४.५ लाख (स्वयं-घोषणा आणि पडताळणी मिळून) महिलांना योजनेतून वगळण्यात आले. याशिवाय, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणारे ३.६० लाख आणि एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी असलेले २.५० लाख अर्जही रद्द करण्यात आले आहेत. एकीकडे, अपात्र कर्मचाऱ्यांकडून वसुली होत नसतानाच, दुसरीकडे दुर्गम भागातील हजारो गरजू महिला ई-केवायसी पूर्ण न झाल्यामुळे अजूनही या योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे. (Ladki Bahin Scheme)

Comments
Add Comment

Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा भीषण अपघात; 5 ते 6 वाहनांची धडक, रिक्षाचा चक्काचूर

पुणे: पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. पुलाच्या तीव्र उतारावर 5 ते 6 वाहने

Junnar Crime : जुन्नर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

पुणे : जुन्नर तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Deepali Chavan Suicide : दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; 5.5 वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पाहा काय आहे निकाल...

 Deepali Chavan Suicide : अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या मृत्यू

Jalgaon Crime : वहिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, विरोध केल्याने वहिनीची हत्या

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर आली होती. नियत फिरलेल्या दिराने वहिनीवरच अत्याचाराचा प्रयत्न

Baramati News : 'जरा बारामतीकडे लक्ष द्या, दादा जाताच...' पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र व्हायरल

बारामती : बारामतीतील विविध समस्या आणि वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर एक कथित खुलं पत्र

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला तरी 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस अद्याप राज्यात म्हणावा तसा झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून