Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश


मुंबई : समुद्रातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत खोल समुद्रात मसल फार्मिंग तसेच केजिंगच्या (जाळे) माध्यमातून कोबिया प्रजातीच्या माशांचे संवर्धन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू करावा. मात्र स्थानिक मच्छिमारांचा गैरसमज होवू नये, यासाठी त्यांना विश्वासात घेण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधावरी दिले. (Nitesh Rane)


मंत्रालयात मदर ओसियन कंपनीच्या वतीने प्रकल्पाचे सादरीकरण कंपनीचे संचालक मितेश शहा यांनी केले. यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., मत्स्य आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जि.प.चे मुख्य कार्यकारी रवींद्र खेबुडकर, कंपनीचे संचालक मितेश शहा, बियॉन्ड एस्पॉय आणि प्रेमदीप व्होरा, तपन सामंत आदी उपस्थित होते.



मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, खोल समुद्रातील मत्स्यसंवर्धनाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादन वाढविणे, आधुनिक मत्स्यपालन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे तसेच मत्स्य व्यवसायातील रोजगार व गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाला महत्त्व आहे. स्थानिक मच्छिमारांचा गैरसमज दूर करून प्रकल्प राबवावा. या प्रकल्पांतर्गत खोल समुद्रात सुमारे ६० मीटर आकाराचे जाळे उभारून त्यामध्ये कोबिया प्रजातीच्या माशांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करण्यात येणार आहे. तसेच खोल समुद्रात मसल अर्थात कालवे पालन करण्याच्या प्रकल्पाचाही यामध्ये समावेश आहे. (Maharashtra)


प्रकल्पासाठी मदर ओसियन कंपनीच्या नॉर्वे येथील कंपनीसोबत संयुक्त उपक्रम असून, या भागीदारीच्या माध्यमातून आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मत्स्य उत्पादन वाढविण्यासोबतच मत्स्यव्यवसायाला व्यावसायिक आणि शाश्वत स्वरूप देण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण प्रकल्पांना चालना देण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा झाली.

Comments
Add Comment

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले

FDA Action : मुंबईतील नामांकित 'ऑटर्स क्लब'सह ६ आस्थापनांवर 'एफडीए'ची कारवाई

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला बूस्टर डोस; पैठणमध्ये 100, पाचोडमध्ये 50 खाटांचे रुग्णालय

मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम

Sindhudurg Umed Mall : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'उमेद' मॉलला मंजुरी

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; गणेशोत्सवाआधी जिल्ह्यातील सर्व रस्ते सुस्थितीत करण्याची पालकमंत्र्यांची

Marathi Bhasha : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास 'बॅज' निलंबित करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २० ऑगस्टपासून राज्यभरात अंमलबजावणी मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना