मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पैठण येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, तर पाचोड येथे 50 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. (Chhatrapati Sambhajinagar)
मंत्रालयात संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आमदार विलास (बापू) भुमरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पैठण आणि पाचोड येथील आरोग्य संस्थांना मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली.
ठाणे : ठाण्यातील कासारवडवली-मोगरपाडा परिसरातील ७८० मीटर लांबीच्या डीपी रस्त्याचे काम स्थानिक नागरिकांशी चर्चा करून सामंजस्याने पूर्ण करण्याचे ...
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठण येथे वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येतात. आगामी कुंभमेळ्यामुळे या परिसरातील भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैठणमध्ये 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव विशेष बाब म्हणून तयार करावा, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पैठण तालुक्यातील पाचोड हे राष्ट्रीय महामार्गावरील तसेच तीन जिल्ह्यांच्या सीमेलगतचे महत्त्वाचे ठिकाण आहे. वाढती लोकसंख्या, महामार्गावरील वाहतूक आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे 50 खाटांचे ग्रामीण रुग्णालय उभारण्याचा प्रस्तावही विशेष बाब म्हणून सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. ( Kumbh Mela Maharashtra)
400 खाटांच्या महिला रुग्णालयाचे 17 सप्टेंबरला लोकार्पण
छत्रपती संभाजीनगर येथील 400 खाटांच्या महिला रुग्णालयाचे 17 सप्टेंबर रोजी मराठा मुक्तिसंग्राम दिनी लोकार्पण करण्याच्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. यासाठी मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि पायाभूत सुविधांसह सर्व व्यवस्था अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले.
पैठण आणि पाचोड येथील प्रस्तावित रुग्णालये तसेच महिला रुग्णालयामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्यसेवेचे जाळे अधिक मजबूत होणार आहे. धार्मिक पर्यटन, वाढती लोकसंख्या, महामार्गावरील वाहतूक आणि कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक आयोजनांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा सक्षम करण्याला शासनाचे प्राधान्य राहील, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.