मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित केला आहे. 18 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आलेल्या तपासणीत हॉटेलच्या स्वयंपाकघरात गंभीर स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या त्रुटी आढळून आल्या.
तपासणीदरम्यान किचनमध्ये जिवंत उंदीर आढळले. उघड्या ड्रेनेजमधून मोठा उंदीर किचनमध्ये येताना आढळला, तर आणखी एक उंदीर छताजवळ दिसून आला. किचनमधील ड्रेनेज लाईन्स उघड्या आणि देखभालीअभावी असल्याचेही आढळले.

याशिवाय अन्न तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांवर, त्यात पीठ मळण्याच्या मशीनवरही जिवंत झुरळे आढळून आली. किचनमध्ये पाणी साचलेले होते, मोठ्या प्रमाणात ग्रीस साचला होता आणि खराब ड्रेनेजमधून पाण्याची गळती होत असल्याचे तपासणीत समोर आले. त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले होते.
पुणे : पावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या उपकरणांबाबत सुरक्षितता बाळगणे किती गरजेचे आहे, याचा एक अत्यंत हृदयद्रावक प्रत्यय पुणे जिल्ह्यातील दौंड ...

FDAकडून थेट कारवाई
या गंभीर त्रुटींची दखल घेत FDAने हॉटेल राधाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे. परवाना क्रमांक 11517010000027 असून, अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 मधील कलम 32(3) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
18 ऑगस्टपासून हॉटेलमधील अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरण यांसह सर्व संबंधित कामकाज तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ही कारवाई FDA आयुक्त IAS तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार अस्वच्छ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधातील कठोर धोरणाचा भाग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.