Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस भरताना अचानक स्फोट झाल्याची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत सीएनजी पंपावर काम करणाऱ्या तीन कामगारांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Navi Delhi)


मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस भरला जात असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटात मनीष नावाच्या २५ वर्षीय कामगाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तो पश्चिम दिल्लीतील बाबा हरिदास कॉलनीचा रहिवासी होता. तर अन्य दोन जखमींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. (Delhi Petrol Pump Blast)



या दुर्घटनेत आणखी तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.


घटनेची माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुपारी ३.३७ वाजता अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर सहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. परिसरात पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यात आले असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.  ( CNG Cylinder Explosion)


दरम्यान, सीएनजी सिलेंडरचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, स्फोटामागील नेमके कारण शोधले जात आहे.

Comments
Add Comment

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत

Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या

Crime News : नवरा गाढ झोपलाय ना? ३ वेळा जाऊन पाहिलं, दोन वर्षांपासून वेगवेगळ्या खोलीत वास्तव्य; बंगळुरुतील दुहेरी हत्याकांडाचा थरार

बंगळुरु : सोशल मीडियावरून झालेल्या अनैतिक संबंधांमधून एका पाच वर्षांच्या चिमुकल्यासह त्याच्या वडिलांची

Kangana Ranaut : "मी देशाची अंधभक्त!" ईशा कोप्पिकरच्या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ; तर खासदार कंगना राणौतची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई : अभिनेत्री ईशा कोप्पिकरने अलिकडेच सोशियल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत स्वतःला 'अंधभक्त' म्हटल्या

Testicle Traffickers : कोट्यवधी रुपयांच्या आमिषाने प्रायव्हेट पार्ट काढला आणि विकत कोण घेईना म्हणून...सोशल मीडिया रील पाहून १६ वर्षीय मुलाची हत्या

भोपाळ : सोशल मीडियावरील एका चुकीच्या आणि अफवा पसरवणाऱ्या व्हिडिओमुळे एका १६ वर्षांच्या निष्पाप मुलाला आपला जीव