Sindhudurg Umed Mall : सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'उमेद' मॉलला मंजुरी

- मंत्री नितेश राणे यांची माहिती; गणेशोत्सवाआधी जिल्ह्यातील सर्व रस्ते सुस्थितीत करण्याची पालकमंत्र्यांची ताकीद


मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी 'उमेद' मॉल उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी बुधवारी मंत्रालयात विविध विभागांच्या आढावा बैठका घेऊन विकासकामांना गती दिली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या प्रवासात अडथळा येऊ नये म्हणून जिल्ह्यातील सर्व खराब रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. ( Umed Mall Sindhudurg)



मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या भौगोलिक आणि लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन 'उमेद' मॉल प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले. या मॉलमुळे स्थानिक उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचेही निर्देश देण्यात आले. ( Nitesh Rane)


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याबाबत 'महाप्रीत'च्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राणे यांनी तांत्रिक नियोजनावर भर दिला. सिंधुदुर्गातील पावसाळी हवामानाचा विचार करून प्रकल्पांची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आवश्यक परवानग्यांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून हे प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत. ( Sindhudurg Development)




गणेशोत्सवापूर्वी रस्ते खड्डेमुक्त करा


गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने चाकरमानी मुंबई-पुणे परिसरातून आपल्या गावी दाखल होतात. या काळात रस्त्यांची दुरवस्था प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरते. याची दखल घेत मंत्री नितेश राणे यांनी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची पाहणी करून सर्व खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले. रस्ते दुरुस्तीसह प्रमुख मार्गांचे सेफ्टी ऑडिट करून अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करणे आणि तिथे तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

Comments
Add Comment

FDA Action : मुंबईतील नामांकित 'ऑटर्स क्लब'सह ६ आस्थापनांवर 'एफडीए'ची कारवाई

मुंबई : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ पुरवठादारांविरुद्ध अन्न व औषध

Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्यसेवेला बूस्टर डोस; पैठणमध्ये 100, पाचोडमध्ये 50 खाटांचे रुग्णालय

मुंबई : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम

Marathi Bhasha : रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बोलता न आल्यास 'बॅज' निलंबित करणार

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; २० ऑगस्टपासून राज्यभरात अंमलबजावणी मुंबई : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना

Mumbai University Exam New Rule : लेट लतीफ विद्यार्थ्यांना बसणार दणका; परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजेरी बंधनकारक

- मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी नवा नियम मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न सर्व

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकर यांची सुनबाई झाली 'प्राण्यांची डॉक्टर'; नणंद साराची प्रतिक्रिया चर्चेत

क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिन

Georgis Gor, Devendra Fadnavis : महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीस!

- अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर यांच्याकडून कौतुक; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डायनॅमिक, एनर्जेटिक आणि कामाची