Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला तरी 'या' ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस अद्याप राज्यात म्हणावा तसा झालेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १९ ऑगस्ट रोजी काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Alert)



कोकणात हलका ते मध्यम पाऊस :


कोकणातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी सरींचाही अंदाज आहे. मात्र, सध्या कोकणातील कोणत्याही जिल्ह्यासाठी अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. पुढील दोन ते तीन दिवस या भागातील हवामानाची स्थिती साधारण अशीच राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)



उत्तर महाराष्ट्रात पावसाची उघडीप :


उत्तर महाराष्ट्रात नाशिक वगळता बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकमध्ये हलका ते मध्यम वादळी पाऊस होऊ शकतो. काही भागांत मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Alert)



पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरला यलो अलर्ट :


अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस तसेच पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत राहू शकतो. (Maharashtra Weather Alert)



मराठवाड्यातील ४ जिल्ह्यांना अलर्ट :


छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. तर जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो. (Maharashtra Weather Alert)



गोंदियात जोरदार पावसाची शक्यता :


विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत सध्या कोणताही अलर्ट नसला तरी पावसाची तूट कायम आहे. गोंदिया जिल्ह्यासाठी मात्र यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीही कोसळू शकतात. (Maharashtra Weather Alert)


एकूणच, १९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता असली, तरी सोलापूर, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि गोंदिया येथे वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढू शकतो. नागरिकांनी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याच्या वेळी आवश्यक ती काळजी घ्यावी तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. (Maharashtra Weather Alert)

Comments
Add Comment

Jyotiba Shravan Shashti Yatra 2026 : श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला २ लाख भाविकांची उपस्थिती

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी म्हणजे जोतिबा डोंगर येथील श्री ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रेला यंदा भाविकांचा

Maharashtra Anti-Conversion Act : 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य' कायद्याची रक्षाबंधनापासून अंमलबजावणी

- महायुती सरकारची लाडक्या बहिणींना विशेष भेट; १० वर्षांपर्यंत कारावास, ७ लाखांचा दंड, धर्मांतराच्या उद्देशाने

Beed Crime : सीझर झालं, गोंडस बाळाचा जन्मही झाला पण... आईच्या पोटात अशी काही वस्तू राहिली की सगळ्यांनाच धक्का बसला

Beed : बीड जिल्हा रुग्णालयात घडलेला एक प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय

Eknath Shinde : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा मधील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला ५० कोटी देण्याचा निर्णय

प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश मुंबई : बुलडाणा

Anand Bansode : आनंद बनसोडे यांची ऑस्ट्रेलियाच्या माऊंट कोसिअस्कोवर तिसऱ्यांदा यशस्वी चढाई

पुणे : ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च शिखर माऊंट कोसिअस्कोवर ३६० एक्स्पलोररचे संस्थापक एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे

Prakash Abitkar : सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित, उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सर्पदंशाची प्रत्येक घटना, विषप्रतिबंधक लसीचा साठा, केलेले उपचार व मृत्यूची माहिती होणार नोंदबद्ध मुंबई :