NTA : नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा मोठा निर्णय, परीक्षा नियोजनातील पारदर्शकतेसाठी ६०० तज्ज्ञांना हटवले

नवी दिल्ली : परीक्षा नियोजनातील पारदर्शकतेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने ६०० तज्ज्ञांना हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या तज्ज्ञांच्या जागेवर नव्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा आणि संबंधित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना आणि निर्देश दिले आहेत. आता चार स्तरिय व्यवस्थेतून प्रत्येक उत्तरपत्रिकेची कसून तपासणी करण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी तपासणी करणाऱ्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एनटीएने परीक्षांच्या आयोजनासाठी सुरक्षा आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे.



राष्ट्रीय स्तरावर परीक्षांचे आयोजन करणाऱ्या एनटीएचा कारभार दिल्लीतील मिंटो मार्गावरील नव्या इमारतीतून हाताळला जाणार आहे. एनटीएशी संबंधित कामकाज जिथून चालणार आहे त्या सर्वच ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. आवश्यक तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. एनटीएच्या कारभाराला सीआयएसएफच्या जवानांचे संरक्षण असेल.



शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उच्च शिक्षण विभागाचे सचिव, एनटीएचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, अलीकडील समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) उचललेल्या पावलांचा आढावा घेण्यासाठी आणि परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत एनटीएने परीक्षा व्यवस्थेतील सुधारणेसाठी आतापर्यंत घेतलेले निर्णय आणि लवकरच घेतले जाणार असलेले निर्णय यावर चर्चा झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रशासनाला कारभार सुधारण्यासाठी सूचना आणि निर्देश दिले.



सर्व परीक्षा प्रक्रियांचे सखोल ऑडिट करून केलेल्या सुधारणात्मक कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश एनटीएला देण्यात आले. नव्या परीक्षा नियमावलीचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देशही शिक्षणमंत्री जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

ChatGPT : किशोरांसाठी आलं अधिक सुरक्षित चॅट जीपीटी

मुंबई : १३ ते १७ वर्षे वयोगटातील किशोरांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करता यावा, यासाठी

Aadhaar Biometric Update : देशातील दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक अपडेट पूर्ण

नवी दिल्ली : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) तर्फे देशभरात युद्ध पातळीवर राबवण्यात येत असलेल्या

Delhi CJP Protest : दिल्लीतल्या सीजेपीच्या आंदोलनात होते माओवादी, जनसंघर्ष समितीचा आरोप

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीसह देशभरात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर

Supreme Court : गळफास पद्धतीने दिली जाणारी फाशीची शिक्षा रद्द होणार नाही, पण... सर्वोच्च न्यायालय नेमके काय म्हणाले ?

नवी दिल्ली : मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी गळफास देण्याची (फाशीची) सध्याची पद्धत रद्द करण्याची

Cockroach Janata Party : सीजेपी आंदोलकांवर 'जास्तीत जास्त संयम आणि किमान बळाचा' वापर

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी तैनात केलेल्या पोलिसांनी

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा